यशराज फिल्म्सच्या आगामी ‘दावत-ए-इश्क’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये परिणीती आणि आदित्य रॉय कपूरच्या तिखट-गोड अश्या प्रेमकथेची झलक पाहावयास मिळते.
हैद्राबादची ‘तेझ’ गुलरेझ (परिणीती चोप्रा) आणि लखनऊचा ‘आशिक’ तारीक (आदित्य रॉय कपूर)च्या प्रेमाची रेसिपी यशराज फिल्म्सने मांडली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला अनुपम खेर हे मुलगी गुलरेझसाठी एका योग्य वराचा शोध घेताना दिसतात. परिणीती नेहमीप्रमाणे तिच्या चुलबुल्या अंदाजात हैद्राबादी भाषा बोलताना दिसते. त्यानंतर मि.यूनिव्हर्सच्या शोधात असलेल्या गुलरेझच्या जीवनात तारीकचा प्रवेश होतो. रंगीबेरंगी शर्ट, बारीक केस असा लूक असलेल्या आदित्यचा ट्रेलरमध्ये लखनवी अंदाज पाहावयास मिळतो. ट्रेलरमध्ये या दोघांचा रोमान्स दर्शवताना मध्येच एक ट्विस्ट येतो आणि पूर्ण चित्र पलटलेले पहावायास मिळते. परिणीती निश्चितचं असं काहीतरी करते ज्यामुळे आदित्यचे हृदय तुटते. ‘दावत-ए-इश्क’साठी साजिद-वाजिद या जोडीने संगीत दिले असून ‘इश्कजादे’ आणि ‘दो दूनी चार’ या चित्रपटांचा दिग्दर्शक हबीब फैसलने याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट यावर्षी ५ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 8, 2014 11:37 am