अहिशोर सोलोमनच्या ‘जॉन डे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिध्द झाला असून ‘वेनसडे’ चित्रपटाचा निर्माता अनजुमन रिझवीने आतिफ ए खान आणि के आसिफ यांच्याबरोबर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नसिरुद्दीन शाह आणि रणदीप हूडा या चित्रपटात प्रमूख भूमिकेत आहेत.
चित्रपटाच्या ट्रेलरची सुरवात गुढरित्या मरण पावलेल्या एका व्यक्तिच्या अंत्यविधीने होते. नसिरुद्दीन शाह या मृत्युचे सहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतांना पहायला मिळतो. अन्य एका प्रसंगात नसिरुद्दीन शाह गाडीची तोडफोड करत असतांना रणदीप हूडा त्याच्यावर बंदुक रोखतांना दिसतो.
पुढील एका दृष्यात बायबल सदृष्य पुस्तकात नसिरुद्दीन शाह बंदुक लपवतांना दिसतो. तर, काही पाठलागाच्या आणि हाणामारीच्या दृष्यांनंतर ‘दुनियाका सबसे खतरनाक जानवर इन्सान होता है|’, रणदीपच्या या संवादाने ट्रेलरचा शेवट होतो.
चित्रपटात शेरनाझ पटेल, शरत सक्सेना, विपिन शर्मा आणि प्रागची अभिनेत्री एलेना खान यांच्या सुध्दा भूमिका आहेत. ‘जॉन डे’ हा चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.