बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जय हो’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. सलमानचा अॅक्शन पॅक अवतार पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला सलमान खान एका वृत्तपत्रावर चित्र रेखाटताना दिसतो. त्यावर राजकारणीच्या भूमिकेत असलेले डॅनी डिन्झोंगपा हे “ऐसे लोगोकी गर्दन काटने से नही बल्की झुकानेसे उनकी मौत होती है” असे खलनायकी डायलॉग बोलताना दिसतात. चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारणारी तब्बू खूप वर्षांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या प्रोमोमध्ये लक्षवेधक ठरलेला सलमानचा डायलॉग म्हणजे, “आम आदमी सोता हुआ शेर है उंगली मत कर जाग गया तो चीर फाड देगा”.
‘जय हो’ मधून सना खान आणि डेसी शाह हे दोन चेहरे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. लोकांमध्ये देशभक्ती भावना जागवण्यास भाग पाडणारे चित्रपटाचा टायटल ट्रॅक लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोहेल खान दिग्दर्शित ‘जय हो’ २४ जानेवरीला प्रदर्शित होईल.