बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री आलिया भट्टने गेल्या काही वर्षांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या प्रत्येक चित्रपटागणिक अभिनयात निपुण होत चालली आहे. लवकरच ती मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आलियाने सोशल मीडियावर यासंबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
आलियाने ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत बुरखा घातलेली आलिया एका व्यक्तीशी फोनवर लपूनछपून बोलताना पाहायला मिळत आहे. ‘परसो मिलते है..सुबह, हा मै राझी हूँ,’ असं म्हणत ती तो फोन ठेवते. खरंतर आलियाच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांनंतर म्हणजेच १० एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Parso milte hain.. subah! Main #RAAZI hoon.. @meghnagulzar @vickykaushal09 @karanjohar @DharmaMovies @JungleePictures @apoorvamehta18 @Soni_Razdan pic.twitter.com/0A7Gb7fMGn
— Alia Bhatt (@aliaa08) April 8, 2018
वाचा : ब्रेकअपनंतरच त्याच्या करिअरला उतरती कळा; कपिलच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा
पुढच्या वर्षी जुलै महिन्यात प्रदर्शित होणारा हा चित्रपट ‘कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित आहे. धर्मा प्रोडक्शन आणि जंगली पिक्चर्सची निर्मिती असलेल्या ‘राझी’ चित्रपटात आलियासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. आलिया यात भारतीय लष्कराला गुप्त माहिती पुरवणाऱ्या पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2018 7:05 pm