14 November 2018

News Flash

VIDEO : वडिलांच्या आठवणीने प्रियांका भावुक

त्यांच्या जाण्यानं प्रियांकाला फार दु:ख झालं, पण तिने नेहमीच त्यांच्या आठवणींतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला.

प्रियांका चोप्रा, Priyanka Chopra

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे. काही दिवसांपूर्वीत प्रियांका आणि निकने त्यांच्या नात्यांची अधिकृत घोषणा केली. ज्यांनंतर या सेलिब्रिटी जोडीचाआनंद गगनात मावेनासा झाल्याचं पाहायला मिळालं. या साऱ्यामध्ये प्रियांका एका खास व्यक्तीच्या आठवणीने गहिवरून गेली. ती व्यक्ती म्हणजे तिचे बाबा.

वडिलांसोबतच असणारं प्रियांकाचं सुरेख नातं कधीच लपून राहिलेलं नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रियांका तिच्या वडिलांची कमतरता जाणवत असल्याचं सांगते. त्यांच्यासोबतचे बरेच फोटोही ती पोस्ट करत असते. सध्याही या ‘देसी गर्ल’ने वडिलांच्या जयंतीनिमित्त एक सुरेख व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने वडिलांचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. व्हिडिओसोबत वाजणारं गाणंही वडील- मुलीच्या नात्याला अगदी हळुवारपणे मांडत आहे.

View this post on Instagram

Dad. U r so missed. Happy birthday. Always and forever.

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

वाचा :निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

काही वर्षांपूर्वीच प्रियांकाच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांच्या जाण्यानं प्रियांकाला फार दु:ख झालं, पण तिने नेहमीच त्यांच्या आठवणींतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचाच प्रत्यय तिच्या या पोस्टमधून येत आहे. ‘बाबा… तुमची खूप खूप आठवण येत आहे. तुम्ही कायमच माझ्यासोबत असाल. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा’, अशा कॅप्शनसह तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर ‘देसी गर्ल’ आणि तिच्या बाबांच्या नात्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या व्हिडिओला अनेक व्ह्यूजही मिळाले आहेत.

First Published on August 24, 2018 12:27 pm

Web Title: watch video bollywood actress priyanka chopra remembers father dr ashok chopra on his 68th birth anniversary