News Flash

दीपिकाने चाहत्याकडे मागितलं मोबाईलचं कव्हर; व्हिडीओ होतोय व्हायरल…

दीपिकाच्या मागणीवर चाहत्यानं दिलं भन्नाट उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone)सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी दीपिका चक्क चाहत्याच्या मोबाईल कव्हरमुळे चर्चेत आहे. दीपिकाला चाहत्याचं मोबाईल कव्हर इतकं आवडलं, की तिने थेट ते कव्हर मला दे अशी मागणीच केली. दीपिकाच्या या मागणीवर चाहत्याने देखील तिला भन्नाट उत्तर दिलं. दोघांच्या या जुगलबंदीचा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

अवश्य पाहा – १६व्या वर्षी ‘हा’ अभिनेता करणार होता आत्महत्या; कारण ऐकून व्हाल थक्क…

अवश्य पाहा – स्वत:च्या नावाचं फेक अकाउंट पाहून विद्युतला बसला झटका; म्हणाला…

दीपिकाच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दीपिकाचं आगमन होताच सर्व फोटोग्राफर्सने तिचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली. दरम्यान गर्दीमधील एका व्यक्तीच्या मोबाईल कव्हरवर तिची नजर पडली. हे कव्हर दीपिकाला प्रचंड आवडलं. हे कव्हर तू मला दे अशी मागणी तिने त्या व्यक्तीकडे केली. यावर तो व्यक्ती म्हणाला, मी तूमचा खूप मोठा चाहता आहे. पाच तारखेला तुमच्या वाढदिवसाला हे कव्हर मी तुम्हाला भेट करेन. हे ऐकून दीपिका खुष झाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

यापूर्वी दीपिका तिच्या बेडरुम सिक्रेटमुळे चर्चेत होती. ‘फेमिना ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये तिने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमादरम्यान तिने रणवीरच्या काही सवयींचा खुलासा केला. कार्यक्रमात बोलताना दीपिकाने बेडरुम सिक्रेटसुद्धा सांगितलं. खरंतर दीपिकाला रणवीरच्या ब्युटी सिक्रेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना दीपिका म्हणाली, “रणवीर अंघोळीला खूप जास्त वेळ घेतो आणि टॉयलेटमध्येही तो बराच वेळ असतो. त्याला तयार व्हायला माझ्यापेक्षाही जास्त वेळ लागतो आणि अंथरुणात यायलाही तो फार वेळ लावतो.” तिचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर सावरून घेत ती पुढे म्हणते, “मला असं म्हणायचं होतं की तो अंथरुणात झोपायला फार वेळ लावतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 11:29 am

Web Title: watch video deepika padukone demands mobile cover from camera person mppg 94
Next Stories
1 सुशांत आत्महत्या प्रकरण : पत्रकार राजीव मसंदची होणार पोलीस चौकशी
2 ‘राजीसाठी मला कुठेच क्रेडिट दिलं नाही’; लेखकाचा मेघना गुलजारवर आरोप
3 …म्हणून नेटकरी करतायेत मिलिंद सोमणची कियारा आडवाणीसोबत तुलना
Just Now!
X