13 December 2017

News Flash

माहिरावर का आली रणबीरकडे विनवणीची वेळ?, व्हिडिओ व्हायरल!

कॅमेरा बंद होताच माहिरा काहिशी अस्वस्थ झालेली दिसली.

मुंबई | Updated: March 20, 2017 12:13 PM

माहिरा खान, रणबीर कपूर

नुकताच दुबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही बॉलिवूडचा ‘हॅण्डसम हंक’ रणबीर कपूर याच्यासोबत दिसली. या दोघांना मंचावर एकत्र पाहण्यासाठी उपस्थितांमध्ये उत्सुकतेचे वातावरण होते. मात्र, कार्यक्रमाच्या सुरुवातीला छायाचित्रकारांना एकत्र पोज देणाऱ्या या जोडीमध्ये काहीतरी बिनसले. इतकेच नव्हे तर माहिरावर रणबीरकडे विनवणी करण्याची वेळ आली, असे काहीतरी या कार्यक्रमात घडले. या कार्यक्रमाचे बॅकस्टेज व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत रणबीर-माहिरा उपस्थितांचे स्वागत करताना दिसतात. तर काही वेळानंतरच आलेल्या एका व्हिडिओत माहिरा रणबीरकडे हात जोडून कसली तरी विनवणी करताना दिसते. तिसऱ्या व्हिडिओत रणबीर माहिराला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र, त्याला काहीही उत्तर न देता माहिरा तेथून जाताना दिसते. नक्की या दोघांमध्ये काय बिनसलंय ते अद्याप कळलेलं नाही.

कॅमेऱ्यासमोर हे दोन्ही कलाकार फार छान पद्धतीने वावरत होते. मात्र, कॅमेरा बंद होताच माहिरा काहिशी अस्वस्थ झालेली दिसली. पण, त्यांच्या चाहत्यांच्या नजरा नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात हे बहुधा दोन्ही कलाकार विसरले आहेत. त्यामुळे त्यांच्यात झालेला वाद काही जणांनी कॅमेऱ्यात कैद केला असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले.

Ranbir Kapoor and Mahira Khan backstage at the Global Teacher Prize Ceremony – 1 #RanbirKapoor #Ranbir #MahiraKhan #GlobalTeacherPrizeCeremony

A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse) on

Ranbir Kapoor and Mahira Khan backstage at the Global Teacher Prize Ceremony – 2 #RanbirKapoor #Ranbir #MahiraKhan #GlobalTeacherPrizeCeremony

A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse) on

‘इंडियन एक्स्प्रेस’ संकेतस्थळाने हे वृत्त दिले असून, याप्रकरणी दोन्ही कलाकारांनी कोणतेही स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही.

Ranbir Kapoor and Mahira Khan backstage at the Global Teacher Prize ceremony – 3 #RanbirKapoor #Ranbir #MahiraKhan #GlobalTeacherPrizeEvent

A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse) on

या दोघांच्याही कामाबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खानसोबत ‘रईस’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी माहिरा सध्या ‘हो मन जहा’ या पाकिस्तानी चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता फवाद खान हादेखील झळणार आहे.

[New Picture] Ranbir Kapoor in Dubai for the Global Teacher Prize ceremony 🏅 #RanbirKapoor #ranbir #Bollywood

A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse) on

रणबीरच्या खिशातही काही चांगले चित्रपट आहेत. सध्या तो राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजय दत्तच्या बायोपिकवर काम करतोय. याव्यतिरिक्त, त्याच्याकडे अयान मुखर्जीचा ‘ड्रॅगॉन’ आणि अनुराग बसूचा ‘जग्गा जासूस’ हे दोन चित्रपट आहेत. ‘जग्गा जासूस’ पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

First Published on March 20, 2017 12:13 pm

Web Title: watch video mahira khan pleads with ranbir kapoor