News Flash

Video: भर पावसात रात्री ३ वाजता मिका सिंगची गाडी बंद पडली अन्…

मुंबईतील एका रस्त्यावर मिका सिंगची गाडी बंद पडली होती.

मुंबईतील एका रस्त्यात मिका सिंगची गाडी बंद पडली होती.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायक म्हणून मिका सिंग ओळखला जातो. त्याने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी गायली असून त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भर पावसात मिका सिंगची गाडी बंद पडल्याचे दिसत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिका सिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रात्री तिनच्या सुमारास मिका सिंगची गाडी मुंबईतील एका रस्त्यावर बंद पडल्याचे दिसत आहे. गाडी बंद पडल्यामुळे मिकाचे चाहते त्याला मदत करताना दिसत आहेत. मिकाने त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा : अमिताभ बच्चन की सोनू सूद? फोटो पाहून चाहते गोंधळात

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडीओमध्ये मिका बोलताना दिसत आहे की, ‘माझी गाडी येथे बंद पडली आहे. पण पाहा किती लोक माझ्या मदतीसाठी आले आहेत. कमीत कमी २०० लोक तरी मदतीसाठी आले आहेत.’ सध्या मिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मिका सिंग अभिनेता कमाल आर खानसोबत सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत होता. केआरकेने बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर टीका केल्यानंतर मिका सिंगने सलमानची बाजू घेतली होती. त्यानंतर केआरकेने मिका सिंगवर टीका केली. शनिवारी मिका सिंगने गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या संगीत कार्यक्रमात हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 11:26 am

Web Title: watch video mika singh car breaks down amid mumbai rains crowd gathers to help avb 95
Next Stories
1 नेहा धूपियाने पुन्हा दिली गुड न्यूज; फोटो शेअर करत म्हणाली…
2 ‘डिलिव्हरी रूममध्ये असताना हरभजन काढत होता फोटो; पत्नी गीताने सांगितला किस्सा
3 कान चित्रपट महोत्सव : तीन दशकांत प्रथमच दिग्दर्शिकेस पाम पुरस्कार
Just Now!
X