16 July 2020

News Flash

ज्युनियर NTR च्या गाण्यावर थिरकले वॉर्नर पती-पत्नी; कारणही आहे खास

पाहा वॉर्नरचा भन्नाट डान्स

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याचं भारतप्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचंही त्याला वेड आहे. बॉलिवूडच्या शीला की जवानी या प्रसिद्ध गाण्यावर त्याने डान्स केला होता. त्यानंतर त्याने आणखी एक झकास व्हिडीओदेखील शूट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याची मुलगी, त्याचं छोटं बाळ, तो स्वत: आणि वॉर्नरची पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करताना दिसले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने आपलं दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर असलेलं प्रेमदेखील दाखवून दिलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुन याच्या एका चित्रपटातील गाण्यावर डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडी यांनी रोमँटिक डान्स केला होता. अल्लू अर्जुनच्या बुट्टाबोम्मा या गाण्यावर त्यांनी डान्स केला होता.

अल्लू अर्जूनच्या गाण्यावर डान्स केल्यानंतर आता वॉर्नरने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेता ज्युनियर NTR याच्या गाण्यावर ताल धरला. ज्युनियर NTR आणि ‘सिंघम’ फेम काजल अग्रवाल यांच्या पक्का लोकल या गाण्यावर डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडी या दोघांनी डान्स केला. या व्हिडीओ सनरायझर्स हैदराबादने स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.

डेव्हिड वॉर्नरने ज्युनियर NTR च्या गाण्यावर डान्स करण्याचं कारणही खास होतं. २० मे रोजी ज्युनियर NTR चा वाढदिवस होता. त्या दिवशी वॉर्नर पती-पत्नीने त्याच्या गाण्यावर डान्स केला आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तोच व्हिडीओ शेअर करत सनरायझर्स हैदराबाद संघाने ज्युनियर NTR ला वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 2:15 pm

Web Title: watch video of david warner and wife candice dances on pakka local song to wish jr ntr on his birthday srh vjb 91
Next Stories
1 ‘तारक मेहतामधून मला बाहेर काढले होते’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
2 “हॉस्पिटलचं बिल भरून मी कंगाल झालोय”; आजारी अभिनेत्याने मागितली आर्थिक मदत
3 ऑनस्क्रिन ‘भल्लालदेव’ची रिअल लाईफमधली ‘देवसेना’; पाहा साखरपुड्याचे फोटो
Just Now!
X