23 September 2020

News Flash

VIDEO: शाहरुखच्या लेकीचा हा स्टेज परफॉर्मन्स पाहिलात का?

शाहरुखची मुले त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत पुढे जात आहेत

छाया सौजन्य- सोशल मीडिया

अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या निमित्ताने व्यग्र असला तरीही येत्या काळात बी टाऊनमध्ये त्याच्या अभिनयाला टक्कर देण्यासाठी काही नव्या जोमाचे कलाकार तयार होत आहेत ही बाब नाकारता येणार नाही. चित्रपटसृष्टीमध्ये दररोज अनेक नवखे कलाकार त्यांच्या अभिनयाचा नजराणा सादर करत असतात. अशाच कलाकारांच्या यादीत आता शाहरुखच्या मुलीच्याही नावाचा समावेश होणार असल्याचे चित्र दिसत आहे. सुहानाने नुकताच तिच्या शाळेत सिंड्रेलाच्या नाटकाचा एक भाग सादर करतानाचा आणि ते पात्र निभावतानाचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

सिंड्रेलाच्या व्यक्तिरेखेला सुहानाने एका वेगळ्याच पद्धतीने व्यासपीठावर सादर केल्याचे पाहायला मिळत आहे. सुहानाचा हा व्हिडिओ पाहता पापा शाहरुख खानला ती सुद्धा अभिनयाच्या बाबतीत टक्कर देऊ शकते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या व्हिडिओमध्ये सुहानाने निळ्या रंगाचा एक गाऊन परिधान केला आहे. सुहानाच्या अभिनयाची ही ऑनस्टेज झलक पाहताना तीसुद्धा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक अभिनेत्री म्हणून नावारुपास येऊ शकते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुखने सांगतिले होते की, सुहानासुद्धा एक अभिनेत्री बनू इच्छिते. ‘सुहानाला एक अभिनेत्री व्हायचे आहे. पण, तिला हा अभिनय माझ्याकडून शिकायचा नाहीये. तीचा हा निर्णय मलाफारच आवडला आहे. कारण तिला माझ्याप्रमाणेच व्हायचे आहे खरे. पण, त्यातही तिला स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख प्रस्थापित करायची आहे’, असे शाहरुख म्हणाला होता. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आपल्या मुलांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करावे अशी इच्छाही शाहरुखने व्यक्त केली आहे. किंग खान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब नेहमीच चर्चेत असते. पण, यावेळी मात्र सुहानाच्या अभिनयामुळे किंग खान चर्चेत आला आहे असेच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 10:52 am

Web Title: watch video shah rukh khans daughter suhana performed in a school play and it is going viral
Next Stories
1 ‘द सेकंड सेक्स’ म्हणजे स्त्रीवादाचं बायबल- वीणा जामकर
2 VIDEO: मालिकेच्या आगळ्यावेगळ्या प्रमोशनमुळे अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक
3 नाटक-बिटक : भारत रंग महोत्सवाचं विकेद्रीकरण!
Just Now!
X