News Flash

पाहा : ‘धूम ३’ चित्रपटातील आमिरच्या परफेक्ट लूकचा व्हिडिओ

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान जसा त्याच्या कामातील परफेक्शनसाठी प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच अनेक चित्रपटातील त्याच्या विविध रूपांसाठी देखील प्रसिद्ध आहे. आमिरने 'धूम ३' चित्रपटातील त्याच्या लूकवर

| November 28, 2013 01:15 am


मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान जसा त्याच्या कामातील परफेक्शनसाठी प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच अनेक चित्रपटातील त्याच्या विविध रूपांसाठी देखील प्रसिद्ध आहे. आमिरने ‘धूम ३’ चित्रपटातील त्याच्या लूकवर खूप मेहनत घेतलेली दिसते. चित्रपटातील साहिरची व्यक्तिरेखा हुबेहूब साकारण्यासाठी पिळदार शरीरयष्टीबरोबर योग्य केशरचनेसाठीदेखील त्याने मेहनत घेतली.
चित्रपटातील इतर व्यक्तिरेखांपेक्षा आपली व्यक्तिरेखा उठून दिसावी, यासाठी त्याने व्यक्तीरेखेसंदर्भातील छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा योग्यप्रकारे पार पडतील, यावर लक्ष दिले. चित्रपटात साहिर कसा दिसेल, यासंदर्भातील विविध गेटअप आमिरवर पडताळून पाहण्यात आले. यातील एका लूकमध्ये आमिरच्या केसांचा रंग सोनेरी आणि गडद तपकिरी रंग करण्यात आला. ‘दिल चाहता है’ चित्रपटातील आमिरची प्रसिद्ध हेअरस्टाईल साकारणारा केशरचनाकार अवान कॉन्ट्रॅक्टरची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
चित्रपटकर्त्यांद्वारे ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सोनेरी केसांचा लूक आमिरने जवळजवळ निश्चित केल्याचे दिसून येते. या लूकसाठी केशरचनाकाराची मनधरणी करतानादेखील तो दिसतो.  केशरचनाकाराच्या मते ही केशरचना आमिरला चांगली दिसत नसल्याने तो आमिरच्या मताशी असहमती दर्शवितो.

पाहा  ‘धूम ३’ चित्रपटातील आमिरच्या परफेक्ट लूकचा व्हिडिओ


साहिरचे योग्य रूप मिळावे, म्हणून आमिरच्या केसांवर विविध रंग आणि केशरचनांचा प्रयोग करण्यात आला. यासाठी कृत्रिम केसांचा देखील वापर केला गेला. सरते शेवटी केसांचा नैसर्गिक रंग कायम ठेवत त्याच्या लूकमध्ये एका हॅटची भर घातली गेली. आमिरचे हे रूप त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडले. २० डिसेंबर रोजी सिनेमागृहात दाखल होणाऱ्या या चित्रपटात कतरिना कैफ, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ आणि उदय चोप्रा देखील काम करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2013 1:15 am

Web Title: watch when aamir khan had almost finalised the blond look for dhoom 3
Next Stories
1 ही माझी शेवटची दिल्ली भेट – सैफ अली खान
2 ऐश्वर्या म्हणते..वेगळं व्हायचंय मला!
3 पाहा : यामी गौतम आणि अली जाफरच्या ‘टोटल सियाप्पा’चा पहिला ट्रेलर
Just Now!
X