बॉलीवूड शहेनशहा म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेता अमिताभ बच्चन हे सोशल मिडीयावर सक्रिय असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल साइट्सवर ते काही ना काही पोस्ट करतच असतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तिंसोबत खासकरुन त्यांची मुलं आणि नातवंडे यांचेही फोटो ते सोशल मिडीयावर पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत त्यांच्यासोबत पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन हेदेखील होते. पण, यात त्यांची मुलगी श्वेता हिचा फोटो कट झालेला दिसत होता. या फोटोला त्यांनी ‘वी आर फॅमिली’ असे कॅप्शनही दिले होते.

https://www.instagram.com/p/BQhCG7RD6hE/

मात्र, काही वेळानंतरच अमिताभ यांनी तोच फोटो पुन्हा एकदा शेअर केला आणि या फोटोत श्वेता कट झालेली नव्हती. तिदेखील फोटोत व्यवस्थित दिसत होती. यावेळी त्यांनी कॅप्शन लिहले की, पुन्हा एकदा आमचे संपूर्ण कुटुंब…. यावेळी कुटुंबातील एक व्यक्ती वगळला गेलेला नाही. आता ठीक आहे ना श्वेता????

https://www.instagram.com/p/BQhdaaUjKig/

अमिताभ यांनी हे दोन्ही फोटो इन्स्टाग्राम या सोशल अकाउन्टवर पोस्ट केले होते.  दरम्यान, बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीमध्ये बुधवारी ४८ वर्षाचा प्रवास पूर्ण केला. या औचित्यावर त्यांनी ट्विटरवरुन चित्रपटसृष्टीतील पदार्पणाच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून १५ फेब्रुवारी १९६९ रोजी अधिकृतरित्या चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या याच आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. यासोबतच त्यांनी १६ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटांची देखील आठवण करुन दिली होती. अमिताभ यांच्या ‘बंधे हाथ’ (१९७३) चित्रपटाला ४४ वर्षे, ‘अग्निपथ’ (१९९०) चित्रपटाला २७ वर्षे तर त्यांच्या ‘एकलव्या’ चित्रपटाला १० वर्षेपूर्ण झाली आहेत.

अमिताभ यांनी ‘सात हिंदूस्तानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी, ‘जंजीर’ या चित्रपटातील अभिनयाने त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. “ये तुम्हारे बाप का घर नहीं , पुलिस स्टेशन है , इस लिए सीधी तरह खड़े रहो .” हा त्यांचा डायलॉग आजही प्रसिद्ध आहे.