15 July 2020

News Flash

यूटय़ूबवर ‘वी आर वन’ जागतिक चित्रपट महोत्सव

३० मे ते ७ जून या कालावधीत मामितर्फे  चार चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

जगभरात करोना आपत्तीने घातलेले थैमान आणि टाळेबंदी यामुळे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांनी एकत्र येत यूटय़ूबवर ‘वी आर वन : ग्लोबल फिल्म फे स्टिव्हल’चे आयोजन के ले आहे. न्यूयॉर्कच्या ट्रिबेका एंटरप्रायईजेसने आयोजित के लेल्या या दहादिवसीय डिजिटल महोत्सवात मामिसह (मुंबई फिल्म फे स्टिव्हल) जगभरातील वीसहून अधिक चित्रपट महोत्सव सहभागी होणार आहेत. ३० मे ते ७ जून या कालावधीत मामितर्फे  चार चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

चित्रपट महोत्सवाची सुरुवात डॉ. प्रतीक वत्स दिग्दर्शित ‘एब अलाय यो’ या चित्रपटाने होणार आहे. हा चित्रपट ३० मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता ‘मामि’च्या संकेतस्थळावर प्रेक्षकांना पाहता येईल. २ जूनला सायंकाळी ४.३० वाजता विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला ‘नटखट’, तर ६ जूनला रात्री ७ वाजता अर्जुन कार्तिकचा ‘नासिर’ हा चित्रपट दाखवण्यात येईल. अतुल मोंगिया दिग्दर्शित ‘अवेक’ या चित्रपटाने महोत्सवाचा शेवट होईल.

‘नटखट’ या लघुपटाची विद्या बालन हिने निर्माता रॉनी स्क्रुवाला यांच्याबरोबर सहनिर्मिती के ली आहे. या लघुपटात विद्या बालनने भूमिकाही के ली आहे. करोना आपत्तीच्या या काळात चित्रपटगृहे बंद असताना आमच्या लघुपटाच्या प्रदर्शनासाठी या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे व्यासपीठ मिळणे यासारखी आनंदाची गोष्ट नाही, अशी भावना विद्याने व्यक्त के ली आहे. अधिक माहितीसाठी  www.weareoneglobalfestival.com,  youtube.com/weareone या संकेतस्थळांना भेट द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 12:10 am

Web Title: we are one world film festival on youtube abn 97
Next Stories
1 ‘त्या इंटीमेट फोटोमुळे माझं पतीसोबत झालं भांडण; सुष्मिता सेनच्या वहिनीचा खुलासा
2 सहा महिन्यांचा झाला तारक मेहतामधील रिटा रिपोर्टरचा मुलगा, पाहा फोटो
3 ‘तुझं तोंड बघून मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला’ स्वरा भास्कर झाली सोशल मीडियावर ट्रोल
Just Now!
X