बॉलिवूडचे बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचे खेळांबद्दलचे प्रेम जगजाहीर आहे. अगदी क्रिकेटपासून प्रो कबड्डी आणि फुटबॉलपर्यंत अनेक स्पर्धांबद्दल अमिताभ सोशल मिडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करतात. खेळप्रेमी असणारे अमिताभ अनेकदा वेगवेगळ्या खेळांमधील भारतीय खेळाडूंचे ट्विटर आणि फेसबुकवरुन अभिनंदन करताना त्यांची स्तुती करताना दिसतात. सध्या इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या आशियाई खेळांमधील अॅथलेटीक्समधील भारताच्या जबरदस्त कामगिरीमुळेही अमिताभ चांगलेच प्राभिवत झाले आहेत. त्यांनी फेसबुकवरुन एक पोस्ट करत अॅथलेटीक्समध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंचे कौतूक केले.
आपल्या पोस्टमध्ये अमिताभ म्हणतात, अॅथलेटीक्समधील भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहून माझी मान अभिमानाने उंचावते. भारतीय खेळाडूंची भन्नाट कामगिरी पाहिल्यानंतर मला अभिमान आणि गर्व वाटतो की मी हे खेळाडू ज्या देशाचे प्रतिनिधित्व करतात त्या भारत देशाचा नागरिक आहे. भारताचे नाव उज्वल करणाऱ्या सर्व अॅथलेटीक्स खेळाडूंना मी सलाम करतो असे अमिताभ या पोस्टमध्ये म्हणतात.
भारताच्या अॅथलेटीक्स चमूने १४ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये पाच सुवर्णपदकांचा आणि नऊ रौप्यपदकांचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 12:28 pm