‘आम्ही बोलतो मराठी’ या आगामी चित्रपटातील संगीताचा प्रकाशन सोहळा नुकताच आळंदी येथे संत ज्ञानेश्वर यांच्या समाधी मंदिरात पार पडला. या सोहळ्यास चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व गीतकार आनंद म्हसवेकर, प्रमुख कलाकार विक्रम गोखले आदी उपस्थित होते. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती श्रीकांत-राजेंद्र, सतीशचंद्र, विजय गटलेवार व मधुकर आरकडे अशा चार वेगवेगळ्या संगीतकारांनी संगीतबद्ध केली आहेत. साहिल म्युझिक कंपनीने चित्रपटातील गाण्यांची ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली आहे.