अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची सर्वात जास्त चर्चेत असलेल्या वेब सिरीजपैकी एक म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. या वेब सिरीजचा दुसरा भाग म्हणजेच ‘द फॅमिली मॅन २’ साठी प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करीत होते. या वेब सिरीजच्या बाबतीत येणारी प्रत्येक अपडेट प्रेक्षक उत्साहाने जाणून घेत ही सिरीज कधी प्रदर्शित होणार ?, असा प्रश्न प्रत्येक जण करताना दिसून येत होता. या सिरीजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतू सिरीजच्या ट्रेलरबाबत एक नवी माहिती समोर येतेय.

‘द फॅमिली मॅन २’ पाहण्यासाठी आतुरलेल्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. या सिरीजचा ट्रेलर उद्या म्हणजेच १९ मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. परंतू हा ट्रेलर नेमकं कोणत्या वेळात प्रदर्शित करण्यात येणार, हे मात्र अद्याप कळलेलं नाही.

सोबतच अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुद्धा या सिरीजबाबतीत दररोज नव नवे अपडेट शेअर करण्यात येत आहे. आता सिरीजच्या ट्रेलर रिलीजबाबतीत अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रेक्षकांना एक सवाल केलाय. यात लिहिलंय, “प्रश्न असा आहे की, उद्या दुपारी १ वाजताचा शुभ मुहूर्त योग्य आहे का? ‘फॅमिली’च्या फॅन्सना हा प्रश्न विचारतोय…”. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने शेअर केलेल्या पोस्टरवरूनच बहूप्रतिक्षित ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर उद्या दुपारी १ वाजता प्रदर्शित करण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

१२ फेब्रूवारीला रिलीज होणार होती ही सिरीज
‘द फॅमिली मॅन’चा दुसरा सीजन १२ फेब्रूवारीला रिलीज करण्यात येणार होता. परंतू काही कारणांमुळे ही सिरीज थांबवण्यात आली होती. त्यानंतर ‘द फॅमिली मॅन २’ मे महिन्यात रिलीज होईल असं बोललं जात होतं, परंतू तारीख मात्र जाहीर करण्यात आली नव्हती. या वेब सिरीजचा दुसरा सीजन येत्या ११ जूनमध्ये प्रदर्शित होईल, असं बोललं जातंय. याच वेब सिरीजचा पहिला सीजन २० सप्टेंबर २०१९ मध्ये रिलीज करण्यात आला होता आणि त्यानंतर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली.

या अ‍ॅक्शन स्पाय थ्रिलर ‘द फॅमिली मॅन २’ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी यांच्यासोबत सामन्था अक्केनेनी, प्रियामनी, शारिब हाश्मी, सीमा बिश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘द फॅमिली मॅन’ मधले मोशे जिवंत आहेत की मृत ? त्यांचं पुढे जाऊन काय होतं हे पाहण्यासाठी फॅन्स दुसऱ्या सीजनसाठी उत्सुक आहेत. या सिरीजमध्ये क्रूर दहशतवादी मूसाची भूमिका अभिनेता नीरज माधव यांनी साकारली होती. या भूमिकेसाठी नीरजला बरीच वाहवा मिळाली होती.