बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सध्या आनंदी असल्याचे पहायला मिळते. कारण लवकरच इराची चुलत बहिण अभिनेत्री झेन मॅरी लग्नबंधनात अडकणार आहे. इरा तिच्या लग्नासाठी जोरदार तयारी करत असल्याचे पाहायला मिळते.
इराने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला झेनच्या लग्नाची तयारी करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. एक फोटो शेअर करत इराने खूप सारे प्रेम असे कॅप्शन दिले आहे तर दुसरा फोटो शेअर करत तिने ‘टीम ब्राइड’ असे म्हटले आहे. इराने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती लग्नाची तयारी करताना दिसत आहे. इरा लग्नाची तयारी करण्यासाठी विशेष मेहनत घेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेत आहेत.
झेन मॅरीने नेटफ्लिक्सवरील ‘मिसेस सीरियल किलर’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, मनोज वाजपेयी आणि मोहित रैना हे कलाकार देखील दिसले होते. तसेच तिने २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कपूर अँड सन्स’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केल्याचे म्हटले जाते. झेन ही दिग्दर्शक मंसूर खान यांची मुलगी आहे. मंसूर यांनी ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 4, 2021 4:24 pm