24 April 2019

News Flash

सुष्मिता सेनही अडकणार विवाहबंधनात ?

सुष्मिता आणि रोहमन गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एका फॅशन इव्हेंटदरम्यान या दोघांचीही भेट झाली होती

बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू झाली आहे. दीपिका-रणवीर सिंग पुढील आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहे. तर काही दिवसांनी प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनासही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा आहे. या चर्चा क्षमत नाही तोच सुष्मिता सेनही विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सुष्मिता ४२ वर्षांची आहे. वयाच्या अठराव्या वर्षी तिनं ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. तर वयाच्या २५ व्या वर्षी तिनं एका मुलीला दत्तक घेतलं. पंधरा वर्षांहून अधिक काळ झाला ती एकटीनं दोन्ही दत्तक घेतलेल्या मुलींचं संगोपन करत आहे. सुष्मिता अजूनही अविवाहित आहे. मात्र पुढील वर्षांत ती कथित प्रियकर रोहमन शॉलसोबत विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा आहे.

सुष्मिताला रोहमननं लग्नाची मागणी घातली असून ते दोघंही एकमेकांसोबत वेळ व्यतीत करत आहेत. दोघांचं एकमेकांसोबत पटलं तर ते दोघंही पुढील वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करतील अशी माहिती सुष्मिताच्या खूप जवळच्या व्यक्तीनं दिली आहे.

सुष्मिता आणि रोहमन गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एका फॅशन इव्हेंटदरम्यान या दोघांचीही भेट झाली होती. रोहमन सध्या तिच्या दोन मुलींसोबतही वेळ घालवत आहेत. जर साऱ्या गोष्टी जुळून आल्या तर नक्कीच सुष्मिता नव्या आयुष्याला सुरूवात करेल अशी आशाही तिच्या जवळच्या व्यक्तीनं व्यक्त केली.

First Published on November 8, 2018 5:11 pm

Web Title: wedding might be on the cards next year for sushmita sen and rohman shawl