छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस मराठीच्या २ पर्वाला सुरुवात झाली असून आता या घरामध्ये रंगणाऱ्या खेळांना रंगत येऊ लागली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये या स्पर्धकांनी प्रवेश करुन चार आठवडे उलटले आहे. या चार आठवड्यांमध्ये घरामध्ये अनेक घडामोडी घडल्या. शनिवार -रविवारी रंगणाऱ्या विकेंडच्या डावामध्ये काही सदस्यांना घरातून बाहेर पडावं लागलं. आता पुन्हा एकदा आज विकेंडचा डाव रंगणार असून घरातून एका सदस्याला बाहेर पडावं लागणार आहे.

बिग बॉस मराठीच्या WEEKEND च्या डावामध्ये महेश मांजरेकर यांनी काही सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या. ‘इतकी भांडणारी लोक मी संपूर्ण जगात पहिली नाहीत’, असे महेश मांजरेकर म्हणाले. तर गेल्या आठवड्यात सगळ्यात चांगली खेळणारी सदस्य म्हणून नेहाचे नाव घेतले. ‘एक डाव धोबीपछाड’ या साप्ताहिक कार्यादरम्यान सदस्यांनी घातलेला राडाबद्दल देखील सदस्यांची कानउघडणी केली. या कार्यात टीम B विजेती ठरली असे मला वाटत नाही, असे महेश मांजरेकर सांगितले. शिव घरात सोडलेला वळू आहे. कॅप्टनसी टास्कसाठी शिवची आणि वैशालीची एक डाव धोबीपछाड या कार्यादरम्यान झालेल्या चुकीच्या वर्तणुकीबद्दल शाळा घेतली. नेहाने या सगळ्या झालेल्या प्रकरणाबद्दल तिची बाजू मांडली. यामध्ये सुरेखाताई काहीतरी बोलतील असे मला वाटले असे नेहा म्हणाली. त्यावर महेश मांजरेकर म्हणाले “सुरेखाताई शनिवार ते शनिवार बोलतात”. तर, नॉमिनेशन टास्क दरम्यान झालेल्या वादावरून देखील घरातील पुरुषांना झापले. “मी या कार्यक्रमाचा होस्ट आहे मला लाज वाटायला लावू नका” असे महेश मांजरेकरांनी घरातील सदस्यांना बजावले.

आज WEEKEND चा डाव मध्ये घरातील कोणी एक सदस्य बाहेर जाणार ? हे नक्की बघा बिग बॉस मराठीच्या WEEKEND चा डावमध्ये आज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.