‘शिवपुत्र संभाजी’ म्हणजे इतिहासाचे नाटय़रूपाने उलगडणारे एक पान. आजवर आपण शिवाजी महाराज्यांच्या जीवनपटांवर आधारित महानाटय़ पाहिलीत, टिटवाळ्यातील राजदीप प्रोडक्शनतर्फे संभाजी राज्यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या महानाटय़ाचे आयोजन केले आहे. डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालया जवळील संत सावळाराम क्रीडा संकुल येथे १७ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत हे महानाटय़ा सादर होणार आहे. संकल्पना, लेखन, दिग्दर्शन ही त्रिसूत्री महेश महाडिक यांनी सांभाळली असून यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार आहेत तसेच अभिनेते रवी पटवर्धन औरंगजेबची भूमिका साकारणार आहेत.
’कधी-१७ ते २२ नोव्हेंबर वेळ: सायंकाळी ६ ते रात्री १०
’कुठे- संत सावळाराम क्रीडा संकुल, पेंढारकर महाविद्यालयाजवळ, डोंबिवली(पू.)

एक जादू अशीही..
बाल दिनानिमित्ताने सुप्रसिद्ध जादूगार जीतेंन्द्र रघुवीर खास बच्चेकंपनीसाठी जादूचे प्रयोग सादर करणार आहेत. हल्लीची मुले केवळ व्हीडियो गेमच्या जगात हरवल्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी आगळावेगळा प्रयोग करून नवीन जादू जीतेंद्र या प्रयोगातून सादर करणार आहेत. व्ही सेक्टर, मास्टर ऑफ प्रेडिक्शन, टय़ुबझ्ॉक, इल्युशन, जादूचे प्रयोग सादर करणार आहेत.
’कधी- रविवार, १५ नोव्हेंबर वेळ : रात्री ८.३० वाजता
’कुठे- आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण.

‘मौनराग’चा विशेष प्रयोग
सुप्रसिद्ध लेखक महेश एलकुंचवार यांच्या लेखणीतून जन्माला आलेली नाटय़कृती आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘मौनराग’ या नाटय़कृतीचा विशेष प्रयोग ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर येथे आयोजित करण्यात आला आहे. या नाटय़कृतीचे नैपथ्य रवी रसिक यांनी केले असून याचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी दिले आहे. यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी अभिवाचन करणार असून अभिनेते सचिन खेडेकर ही नाटय़कृती सादर करणार आहेत.
’कधी- रविवार, १५ नोव्हेंबर  वेळ : सायंकाळी ५ वाजता
’कुठे- डॉ.काशिनाथ घाणेकर, मिनी थेएटर, ठाणे(प.).

‘हाँगकाँग’वर बोलू काही
एखाद्या देशाविषयीचे कुतूहल केवळ पर्यटन स्थळांपुरतं मर्यादित असतं. परंतु ‘त्या’ देशाची संस्कृती, तेथील राहणीमान, वाहतूक व्यवस्था, शिक्षण पद्धती, आरोग्यसेवा, व्यवसायाच्या संधी, भौगोलिक तसेच ऐतिहासिक महत्त्व, खानपान सुविधा आदीं गोष्टींबद्दल आपण फारसा विचार करत नाहीत. परदेशात काही उल्लेखनीय घडत असतं ज्याच्या उपयोग आपण आपल्या देशातही करू शकतो, पण यासाठी त्या देशाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे असते. यासाठी डोंबिवलीतील ‘विविसु डेहरा’ या पर्यावरणप्रेमी संस्थेतर्फे ‘जडला पर्यटनाचा छंद, गप्पा मारू स्वच्छंद’ हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत रविवारी, प्रसिद्ध लेखिका पद्मा कऱ्हाडे यांचा हाँगकाँग येथील अनुभवावर आधारित त्यांची मुलाखत आयोजित केली आहे. प्राची गडकरी त्यांची मुलाखत घेणार आहेत. संपर्क : ९८३३४१०३६५.
’कधी – रविवार, १५ नोव्हेंबर  वेळ : सायंकाळी ६ वाजता,
’कुठे- वासन आय केअर हॉस्पिटल, मानपाडा रोड, गावदेवी मंदिराजवळ, डोंबिवली (पू.)