News Flash

‘वेलकम बॅक’साठी दुबईतली रॉयल नौका

चित्रीकरणासाठी भारताबाहेरील ठिकाणांची निवड केल्यामुळे फिरोझ ए नादियदवालाचा 'वेलबक बॅक' हा चित्रपट सर्वात महाग चित्रपटांपैकी एक असणार आहे.

| December 3, 2013 03:34 am

चित्रीकरणासाठी भारताबाहेरील ठिकाणांची निवड केल्यामुळे फिरोझ ए नादियदवालाचा ‘वेलबक बॅक’ हा चित्रपट सर्वात महाग चित्रपटांपैकी एक असणार आहे. आता यात भर पडली आहे ती रॉयल नौकेची.
दुबईतील एका रॉयल कुटुंबाने त्यांच्या वैयक्तिक नौकेवर ‘वेलकम बॅक’चे चित्रीकरण करण्याची परवानगी दिली आहे. या रॉयल नौकेवर दोन हेलिपॅडची सुविधाही उपलब्ध आहेत. या बातमीला दुजोरा देत नादियदवाला म्हणाले की, पहिल्यांदाच ही नौका चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. या भव्य नौकेत स्विमिंग पूल, ५० कर्मचारी आणि दोन हेलिपॅड आहेत. गेले काही वर्ष मी या कुटुंबास ओळखतो. मी आणि दिग्दर्शक अनीस बाझ्मीने या नौकेची पाहणी केली असून, त्यात काही व्यवस्था केल्या आहेत. आम्ही हवाई कॅमे-यांनी शूट करण्याची योजना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 3:34 am

Web Title: welcome back uses dubai royaltys yacht for shoot
Next Stories
1 प्रियांका गिरवतेय मणिपूरी भाषेचे धडे!
2 राजपाल यादवला दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी
3 CELEBRITY BLOG: हे इद्यापीट म्हणजे काय?
Just Now!
X