चकाचक ट्रेलर, कर्णमधुर गाणी यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता हळूहळू वाढवत नेत, ‘वेल डन बेबी’ बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरत आहे, ज्याला सर्वच स्तरांतून वाहवा मिळत आहे. या आगामी मराठी चित्रपटाची कथा आपल्याला प्रेम, आयुष्य यांच्यासोबत एका भावनात्मक रोलरकोस्टरमध्ये घेऊन जाते. अभिनय, प्रोडक्शन आणि कॉन्सेप्टचा विचार करताना, या चित्रपटाविषयी पुष्कर जोग याच्या मनात आणि विचारामध्ये देखील याला एक विशेष स्थान आहे.

पुष्करसाठी ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट खास आहे. या विषयी बोलताना, पुष्कर (जो चित्रपटात मुख्य अभिनेता आदित्यची भूमिका साकारतो आहे) म्हणाला, “वेल डन बेबीच्या कथेला माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. मी यातील व्यक्तिरेखेला अगदी स्वाभाविकपणे सादर करू शकतो, मी त्याच्यासोबत स्वत:ला पूर्णपणे जोडून घेऊ शकतो, कारण मी हल्लीच बाबा झालो आहे. माझा स्वत:चा वैयक्तिक अनुभव डोळे उघडणारा होता ज्यामुळे मी या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि आदित्यची व्यक्तिरेखा यांचा संबंध अनुभवू शकतो. संपूर्ण प्रवास, एका जोडप्यामधील जटीलतेपासून, तो क्षण त्यांच्या आई बाबा बनण्यापर्यंतचा, खऱ्या अर्थाने जवळ येण्याचा आहे; गर्भावस्थेची प्रत्येक पायरी आपल्या आपल्यामध्येच एक आनंददायक अॅडवेंचर आहे. मला विश्वास आहे कि प्रेक्षक देखील या अंतहीन कथेला तितकेच खास समझून घेतील जितकी ती माझ्यासाठी आहे.”

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे, जे घटस्फोट घेणार आहेत, परंतु नशिबाने त्यांना आश्चर्यकारकरीत्या एका वळणावर आणून उभे केले आहे. प्रियंका तन्वर दिग्दर्शित आणि मर्मबंधा गव्हाणे लिखित, या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग निर्मित आणि व्हिडीओ पॅलेसद्वारे सादर करण्यात येत असलेला हा चित्रपट भारतातील प्राईम सदस्य 9 एप्रिल 2021 पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील.