07 March 2021

News Flash

PHOTO : लग्नाचं वृत्तं जाहीर होताच सोनम ‘आनंद’ व्यक्त करते तेव्हा…

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रेमकहाणीचे विविध पैलू आजवर पाहायला मिळाले. हासुद्धा त्याचाच एक भाग

सोनम कपूर, आनंद अहूजा

लगीनघाई म्हटलं की अनेकांच्याच उत्साहाला सुमार राहत नाही. त्यातही सेलिब्रिटींच्या घरच्या लगीनघाईची बात काही औरच. सध्या बॉलिवूडमध्ये असंच वातावरण पाहायला मिळत असून, कपूर कुटुंबामध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. आपल्या एका हास्याने आणि स्टाईल स्टेटमेंटने अनेकांची मनं जिंकणारी अभिनेत्री सोनम कपूर लवकरच प्रियकर आनंद अहूजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. कपूर कुटुंबाकडून नुकतीच त्यांच्या लग्नाविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली. व्यावसायिक आनंद अहूजा आणि सोनम गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याशिवाय साधारण वर्षभरापूर्वीपासून सोशल मीडियावरही त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा पाहायला मिळाल्या. आपल्या नात्याविषयीची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही या बहुचर्चित जोडीमधील सुरेख संवाद पाहायला मिळाला.

कपूर कुटुंबाकडून सोनम आणि आनंदच्या लग्नाची घोषणा करताच आनंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केली. कादंबरीकार आणि कवी रोआल्ड दाहल यांचं एक विधान त्याने पोस्ट केलं. जे लोक चमत्कारांवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना कधीच ते सापडणार नाही, त्यांची अनुभूती होणार नाही. अशा आशयाचं हे विधान पोस्ट करत तो व्यक्त झाला. आनंदची ही पोस्ट पाहताच कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच त्याला आणि सोनमला शुभेच्छआ देण्यास सुरुवात केली.
मुख्य म्हणजे खुद्द सोनमनेही आनंदच्या या पोस्टला कमेंट करत त्यात #everydayphenomenal असं लिहिलं. ज्यासोबतच तिने प्रेम व्यक्त करणारे काही स्माईलीसुद्धआ वापरले. सोनमची ही कमेंट पाहिल्यानंतर तिची आनंद व्यक्त करण्याची पद्धत अनेकांनाच भावली.

वाचा : UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत

 

८ मे रोजी मुंबईत सोनम आणि आनंदची लग्नगाठ बांधली जाणार असून, दोघांच्याही कुटुंबांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ‘कपूर आणि अहूजा कुटुंबियांना सोनम आणि आनंदच्या लग्नाविषयीची माहिती देताना फारच आनंद होतोय. ८ मे रोजी या दोघांचं लग्न होणार असून, या दोन्ही कुटुंबांकडून ही अत्यंत खासगी बाब आहे. तुम्हा सर्वांच्याच प्रेमासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत’, असं सोनम आणि आनंदच्या कुटुंबाकडून एका पत्रकात म्हटलं गेलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 3:38 pm

Web Title: what bollywood actress sonam kapoor said to soon to be husband anand ahuja after confirming wedding instagram
Next Stories
1 VIDEO : मैत्रीणींसोबत ‘हा’ खेळ खेळण्यात रमली सुहाना
2 Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात रंगणार चोर- पोलीसचा खेळ
3 हसण्यासाठी जन्म आपुला…
Just Now!
X