बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो नेहमीच चर्चेत असतो. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा हा शो नेहमी टीआरपी यादीमध्ये टॉप १०मध्ये असतो. यंदा पहिल्यांदाच करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाही. तसेच या वेळी शोसाठी काही नियम आखण्यात आले आहेत.

पहिलेच्या सीझन प्रमाणेच यंदाच्या सीझनमध्ये अमिताभ बच्चन आणि स्पर्धक कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसणार आहेत. हॉट सीटवर बसणाऱ्या स्पर्धकाच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर नेहमी प्रश्न दिसत असल्याचे आपण पाहतो. पण समोर बसणाऱ्या अमिताभ यांच्या स्क्रीनवर नेमकं काय दिसत असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

 

View this post on Instagram

 

जी हाँ हुज़ूर मैं काम करता हूँ, मैं तरह तरह के काम करता हूँ , मैं क़िस्म क़िस्म के काम करता हूँ कुछ काम किए थे मैंने मस्ती में कुछ किए प्रात- रात ज़बरदस्ती में ये kbc की लत लगी है, लोगों को संतुष्ट करूँ बस यही अपेक्षा Sony को शुरुआत हुई है, अभी तो दिन कुछ बाक़ी हैं स्नेह आदर प्यार मिले, तो हम आभारी हैं – ab हम अपना काम करें, तुम अपना काम करो (Aadaraniya kavivar Bhavani Prasad Mishra se prabhavit )

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

‘आज तक’ने दिलेल्यावृत्तामध्ये ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने अमिताभ यांच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर नेमकं काय असतं याचा खुलासा केला आहे. केबीसीमध्ये १२ लाख ५० हजार जिंकणारे अभिनव हे फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळताना अमिताभ यांच्या मागे बसले होते. त्यावेळी त्यांनी अमिताभ यांच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर काय असते हे सांगितले आहे.

बिग बींच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक ब्लॅक झोन असतो ज्यामधून दोन्ही म्हणजे समोरच्या स्पर्धकाचा कॉम्प्युटर ऑपरेट केले जातात. या ब्लॅक झोनमध्ये सर्व कंटेंट असतो. या व्यतिरिक्त हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाने जिंकलेले पैसे आणि वापरलेल्या लाइफलाइन दाखवलेल्या असतात.

तसेच हॉट सीटवर बसणाऱ्या व्यक्तीची माहिती अमिताभ यांच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर असते. स्पर्धकाने प्रश्नाचे उत्तर देताच ते उत्तर चुकीचे आहे की बरोबर हे अमिताभ यांना सर्वात पहिले कळते.

लवकरच कौन बनेगा करोडपतीचे पर्व १२ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २८ सप्टेंबर रोजी या शोचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे.