News Flash

न्यूड फोटोशूटवर मिलिंद सोमणचं प्रत्युत्तर; “देवानं आपल्याला…”

प्रत्युत्तर देताना नेटकऱ्यांनाही केला सवाल

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूटप्रकरणी मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी मिलिंदने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या कित्येक वर्षांपासून मी न्यूड फोटोशूट करतोय. जेव्हा मी पहिल्यांदा केलं, तेव्हासुद्धा चर्चेत होतो. गोव्याच्या प्रकरणापूर्वीही मी अनेक न्यूड फोटोशूट केले आहेत”, असं तो म्हणाला.

‘पिपिंगमून’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तो पुढे म्हणाला, “मी जेव्हा जेव्हा न्यूड फोटोशूट करतो, तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. नग्न व्यक्ती म्हणजे काय? जसं देवाने आपल्याला बनवलंय तेच. असं नाहीये ना की आपण इंटरनेटवर नग्न लोकांना पाहू शकत नाही. इन्स्टाग्रामवर असे बरेच न्यूड फोटो असतात. प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाची स्वप्नं वेगवेगळी असतात.” यावेळी मिलिंदने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाल्याचं नाकारलं. मला अद्याप याविषयीही कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही, असं त्याने स्पष्ट केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

आणखी वाचा- मिलिंद सोमणचा ‘पौरषपूर’ प्रदर्शनापूर्वीच बोल्ड दृश्यांमुळे चर्चेत

मिलिंदने त्याच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त हा न्यूड फोटो पोस्ट केला होता. या फोटोवरून सोशल मीडियावरही बराच वाद झाला. मिलिंद ‘पौरषपूर’ या आगामी वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या सीरिजमधील त्याच्या अनोख्या लूकचीही जोरदार चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 2:09 pm

Web Title: what is a naked person the way god has made us says milind soman on his nude photoshoot ssv 92
Next Stories
1 कंगना रणौतवर कोसळला दु:खाचा डोंगर; चाहत्यांसमोर झाली भावूक
2 ‘दख्खनजा राजा ज्योतिबा’ मालिकेत यमाईच्या भूमिकेत ऐताशा संझगिरी
3 बोमन इराणी यांच्या बहिणीच्या घरी कोट्यवधींची चोरी
Just Now!
X