अखेर ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा आठवा सिझन आज प्रदर्शित झाला. मागील अनेक दिवसांपासून फेसबुक, ट्विटर, इन्स्ताग्राम स्टोरीज, व्हॉट्सअपवर या मालिकेची चांगलीच चर्चा सुरु होती. या मालिकेचे हे अखेरचे पर्व असल्याने अनेकांची उत्सुक्ता शिगेला पोहचील आहे. एकीकडे असे चित्र असतानाच दुसरीकडे अनेकांना हे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे GOT नक्की काय प्रकार आहे याबद्दलची काहीच माहिती नाही. म्हणूनच या लेखातून आपण अगदी सोप्प्या भाषेत जाणून घेणार आहोत जगाला वेड लावणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’बद्दल…

राज्य करण्याची सुप्त इच्छा ही मानव या पृथ्वीवरील सर्वात प्रगल्भ प्राण्याला मिळालेली एक जन्मजात देणगी आहे. पुढे या इच्छेचे महत्त्वाकांक्षेत रूपांतर होते. आणि सम्राट अशोक, जॉर्ज वॉशिंग्टन, अडॉल्फ हिटलर, मायकेल जॅक्सन, सर डॉन ब्रॅडमन यांसारखी काही असामान्य व्यक्तिमत्त्वे निर्माण होतात. या सर्व मंडळींची कार्यक्षेत्रे भिन्न आहेत. परंतु विशिष्ट क्षेत्रावर स्वत:चे आधिपत्य स्थापन करणे हा एक समान धागा यांच्यात आहे असे म्हणता येईल. साम्राज्य निर्माण करणे हे सोपे असते, परंतु ते टिकवणे हे फार कठीण काम आहे. ते टिकवण्यासाठी आíथक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध पातळींवर प्रयत्न केले जातात. पाहता पाहता प्रयत्नांची प्रखरता कमाल मर्यादेपर्यंत पोहोचते. आणि किलगचे युद्ध, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, व्हिएतनाम युद्ध, भारत – पाकिस्तान युद्ध असा रक्तरंजित इतिहास निर्माण होतो. थोडक्यात काय तर आधिपत्य स्थापन करणे आणि ते टिकवणे हे राज्यकर्त्यांच्या अंगात प्रतिस्पध्र्याला वारंवार नामोहरम करण्याची क्षमता किती आहे यावर अवलंबून असते. प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवलेली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका याच संकल्पनेवर आधारित आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे अगणित राजकीय ताकद मिळवण्यासाठी सुरू झालेला सत्तेचा खेळ होय. जॉर्ज आर. आर. मार्टनि यांच्या ‘साँग ऑफ आइस अ‍ॅण्ड फायर’ या कादंबरीवरून या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. २०११ साली सुरू झालेल्या या मालिकेचे सातवे सत्र लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मार्टनि यांनी या कादंबरीचे लिखाण सात भागांत केले आहे. यांतील प्रत्येक भागावर अनुक्रमे एक सत्र या क्रमाने आत्तापर्यंत सात सत्रांची निर्मिती झाली होती. आज प्रदर्शित झालेल्या आठव्या सत्राबद्दलही लोकांच्या मनात तेवढीच उत्सुकता आहे.

bade miyan chote miyan release date
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
The Sabarmati Report movie Teaser
“आग लागली नाही, तर लावली”, ‘द साबरमती रिपोर्ट’चा थरारक टीझर प्रदर्शित, 12th Fail फेम विक्रांत मेस्सीने वेधलं लक्ष
Wedding Video
नवरी होती स्टेजवर अन् हेल्मेट घालून आला प्रियकर, लग्न मंडपात नवरदेवाला ढकलून केलं असं काही…; व्हिडिओ झाला व्हायरल

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही ‘वेस्टोरॉस’ या साम्राज्याची कथा आहे. वेस्टोरॉसचे सर्वसाधारणपणे दोन भागांत विभाजन करता येते. उत्तरेकडे स्टार्क ऑफ विंटरफेल (रुल्स ऑफ नॉर्थ), ट्ली ऑफ रिव्हरन (रुल्स ऑफ रिव्हरलँड), अ‍ॅरेन ऑफ द एरी (रुल्स ऑफ व्हेल) आणि दक्षिणेकडे लॅनिस्टर ऑफ कॅस्टर्ली रॉक (रुल्स ऑफ द वेस्टरलँड), ब्रॅथॉन ऑफ स्टॉम्र्स एंड (रुल्स ऑफ द स्टॉर्मलँड), ट्रेल ऑफ हायगार्डन (रुल्स ऑफ द रिच), मार्टेल ऑफ सन्सस्पेअर (रुल्स ऑफ ड्रोन) या सात राज्यांचे मिळून वेस्टोरॉस या साम्राज्याची निर्मिती झाली आहे. किंग्स लँडिंग ही या साम्राज्याची राजधानी असून या सात लहान राज्यांवर राज्य करणारा राजा ज्या सिंहासनावर बसतो त्याला ‘आयर्न थ्रोन’ असे म्हटले जाते.

ज्याप्रमाणे भारतात पंतप्रधानपद मिळवण्यासाठी ‘काँग्रेस पक्ष’, ‘भारतीय जनता पक्ष’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’,‘बहुजन समाज पक्ष’, ‘समाजवादी पक्ष’ हे विविध राजकीय पक्ष सातत्याने राजकारण करत असतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करतात त्याचप्रमाणे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही संपूर्ण मालिका ‘आयर्न थ्रोन’ची ताकद मिळवण्यासाठी खेळलेल्या विविध राजकीय राजनतिक खेळींवर आधारित आहे. प्रत्येक देशाला अंतर्गत वादांबरोबरच देशाबाहेरील सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे वेस्टोरॉस या साम्राज्यालाही बाहेरील संकटांपासून धोका आहे. या संकटांना थोपवण्यासाठी उत्तरेला एक मोठी िभत उभारण्यात आली आहे. त्याला ‘द वॉल’ असे म्हणतात. या िभतीच्या पलीकडे राजाच्या शासनाखाली राहणे पसंत न करणारे लोक राहतात त्यांना ‘वाइल्ड िलग्स’ असे म्हणतात. या लोकांना राज्यात येण्यापासून रोखण्यासाठी सनिकांची विशाल फौज तनात करण्यात आली आहे. त्यांना ‘नाइट्स वॉच’ म्हणतात. या खेळाची ही रचनाच त्याच्या लोकप्रियतेचे मोठे कारण ठरली आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. टेलिव्हिजनच्या इतिहासातील अनेक यशस्वी मालिकांमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल एवढी या मालिकेची लोकप्रियता वादातीत आहे. ही मालिका ‘एचबीओ’ दूरदर्शन वाहिनी आणि इंटनेटवर ‘हॉट स्टार’ व ‘एचबीओ’ या वाहिन्यांवर प्रदर्शित केली जाते. इंटरनेटवर पाहण्यासाठी प्रत्येक भागामागे ७० अमेरिकी डॉलर्स खर्च करावे लागतात. परंतु फ्री इंटरनेटच्या जगात कितीही लोकप्रिय कलाकृती असली तरी प्रेक्षक खर्च करून पाहणे पसंत करत नाहीत. येनकेनप्रकारेण ही मालिका पाहिलीच जाते. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’च्या नोंदीप्रमाणे २०१५-१६ मध्ये १७० देशांमधून १० दशलक्षपेक्षा जास्त लोकांनी ही मालिका अनैतिक पद्धतीने इंटरनेटवरून डाउनलोड केली.

मालिकेच्या यशामागील रहस्य

या मालिकेच्या यशाचे प्रमुख कारण त्याची पटकथा व दिग्दर्शक डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वाईस यांचे त्यावरील नियंत्रण होय. ज्या प्रमाणे ‘महाभारत’ या पुराणकथेत भीष्म, कृष्ण, अर्जुन, कर्ण, द्रौपदी, अभिमन्यु, भीम यांसारख्या अनेक व्यक्तिरेखा आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वत:ची एक पाश्र्वभूमी आहे. आणि त्याचा थेट परिणाम शेवटी हस्तिनापूरचे साम्राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धात तो दिसून योतो. त्याचप्रमाणे ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये डॅनेरिस टारगॅरियन, जॉन स्नो, टीरियन लॅनिस्टर, सरसी लॅनिस्टर, आर्या स्टार्क, नेड स्टार्क, खाल ड्रेगो, मारगेरी टायरेल, जोरोह मॉरमोंट, रुझी बॉलटॉनयांसारखी अनेक पात्र आहेत. या प्रत्येक पात्राची स्वत:ची एक पाश्र्वभूमी आहे, कथा आहे. अशा प्रचंड वैविध्य असलेल्या कथेला योग्य पद्धतीने डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वाईस यांनी प्रेक्षकांपर्यत पोहोचवले. याशिवाय या मालिकेत प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या तोंडी अर्थपूर्ण संवाद येतात आणि त्याची धार प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. प्रेक्षकांना कथेबरोबर वाहवत नेण्याची किमया दिग्दर्शकांनी साकारली. वरवर पाहिले तर ही मालिका प्रेक्षकांच्या भावनांना जाणिवपूर्वक आवाहन देणारी वाटते पण हे त्याचे एकतर्फी स्वरुप झाले. यांत या व्यतिरिक्त उत्साह, िहमत, सौदर्यदृष्टी. संगीत, अद्भुत कल्पना आणि युद्ध यांचे प्रदर्शन केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, थ्रीडी अ‍ॅनिमेशन, चित्रीकरणासाठी भव्य सेट, आकर्षीत करणारी वेशभूषा अशा विविध अंगानी जाणारी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय कलाकृती आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशा फार थोडय़ा मालिका आहेत. यात ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे नाव कायम अग्रस्थानी राहिल, यात शंका नाही.

(मूळ लेख १८ जून २०१७ रोजी लोकसत्ताच्या रविवार वृत्तांतमधील ‘हॉलिवूडच्या टेकडीवरुन’ या सदरात मंदार गुरव यांनी लिहिला आहे.)