23 November 2020

News Flash

“काय बोलतेस तूला तरी कळतं का?” POK म्हणजे काय माहित नसल्यामुळे अभिनेत्री होतेय ट्रोल

कंगनाला विरोध करणाऱ्या अभिनेत्रीची उडवली जातेय खिल्ली

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं. या वादात काही कलाकारांनी कंगनाची बाजू घेतली, तर काहींनी तिच्यावर टीका केली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री अर्शी खान हिने देखील कंगनावर निशाणा साधला होता. परंतु POK म्हणजे नेमकं काय? हेच सांगता न आल्यामुळे तिला आता ट्रोल केलं जात आहे.

अवश्य पाहा – कंगना हिमाचलला परतली, जाता जाता पुन्हा मुंबईबद्दल बोलली

आज तकवर झालेल्या एका डिबेटमध्ये अर्शी खानने कंगनावर जोरदार टीका केली. ती मांडत असलेल्या विचारांचा विरोध केला. या डिबेटमध्ये भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा कंगनाची बाजू मांडत होते. त्यावेळी त्यांनी अर्शी खानला POK म्हणजे काय हा प्रश्न विचारला. परंतु या प्रश्नाचं उत्तर अर्शीला देता आलं नाही. परिणामी कंगनाच्या समर्थकांनी आता अर्शीची सोशल मीडिटाद्वारे खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. POK म्हणजे काय सांगता न आल्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

अवश्य पाहा – “अंकितावर आरोप करुन प्रसिद्धीचा प्रयत्न सुरु”; शिबानीच्या टीकेवर अपर्णाचं प्रत्युत्तर

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. यावर कंगनानं ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा’, असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई विमानताळवर कंगना विरोधात घोषणाबाजी देखील केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 12:13 pm

Web Title: what is pok sambit patra arshi khan mppg 94
Next Stories
1 ड्रग्स प्रकरण: लवकरच सारा अली खानला पाठवले जाऊ शकते समन्स
2 कंगनाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ट्विट, म्हणाली…
3 ५ मिनिटाच्या भेटीत अक्षयला मिळाले होते ३ चित्रपट, पण ठरले फ्लॉप
Just Now!
X