News Flash

‘डॉन’ शशिकलांवर रामू काढणार सिनेमा

अत्यंत हैराण करणाऱ्या गोष्टी या सिनेमात दाखविणार आहेत

देशात एखादी घटना घडली आणि त्यावर कोणी सिनेमा बनवणार असेल अशी घोषणा झाली तर ते नाव म्हणजे राम गोपाल वर्मा. राम गोपाल वर्माही अशी व्यक्ती आहे जी वादग्रस्त विधानांमुळे किंवा कृतीमुळे सतत चर्चेत असते. देशातील कोणत्याही घटनांवर सिनेमा बनविण्याबाबत रामगोपाल वर्मा हे नेहमीच आघाडीवर असतात, मग भलेही तो सिनेमा फ्लॉप झाला तरी चालेल. सध्या तामिळनाडूच्या राजकारणातील महत्वाची व्यक्ती शशिकला यांना झालेली अटक आणि त्यापूर्वीच्या घटनाक्रमावर रामगोपाल वर्मा यांनी ट्विट करीत या घटनेवर सिनेमा करणार असल्याचे जाहीर केले होते.

आता या संदर्भातील एक पोस्टही त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. शशिकला यांच्यावर जो सिनेमा बनवण्यात येणार त्यासंदर्भातले काही मोठे खुलासे राम गोपाल वर्माकडे आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये रामगोपाल वर्मा यांनी शशिकला यांची तुलना ‘डॉन’ अशी केली आहे. गॉडफादर या कादंबरीतील पात्र डॉन कोर्लिऑन याप्रमाणे शशिकला या मन्नारगुडीच्या माफिया असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे बोलूनच ते थांबले नाही तर रामगोपाल वर्मा यांनी दावा केला आहे की, जयललिता यांच्या पोयस गार्डन या निवासस्थानातील नोकरांनी जयललिता आणि शशिकला यांच्यातील संबंधाबाबत स्फोटक माहिती दिली आहे. अत्यंत हैराण करणाऱ्या गोष्टी ते आपल्या सिनेमात दाखविणार आहेत.

तसेच पोयस गार्डन येथील बागकाम करणाऱ्या कामगारांच्या अनुसार शशिकला यांनी पलानीस्वामी यांना पाठिंबा दिल्यामुळे अनेक आमदार पलानीस्वामी यांना पाठिंबा देत आहेत. पलानीस्वामी हे शशिकला यांच्या हातचे बाहुले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Next Stories
1 सलमानची अॅमी जॅकसनला पसंती
2 मेकअपशिवाय समोर आलेल्या माधुरीने छायाचित्रकारांपासून लपविला चेहरा
3 भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अभिनेत्याला तीन दिवसांचा तुरुंगवास
Just Now!
X