News Flash

सोनम आपल्या प्रियकरासोबत लंडनला राहते?

आनंद अहुजा हा दिल्लीस्थित व्यावसायिक आहे

सोनम आपल्या प्रियकरासोबत लंडनला राहते?
सोनम कपूर तिच्या तथाकथित प्रियकरासोबत

बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर सध्या लंडनमध्ये आहे. हर्षवर्धन या आपल्या भावाचा पहिला सिनेमा ‘मिर्झिया’ला प्रमोट करायला तिने लंडन गाठले.’ बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘मिर्झिया’चा प्रिमिअर शो मोठ्या थाटात पार पडला. यावेळी हर्षवर्धनला पाठिंबा देण्यासाठी सोनम आणि बाबा अनिल कपूरही तेथे उपस्थित होते. पण प्रिमिअर शो झाल्यानंतर ती भारतात परतली नसून लंडनमध्येच थांबली आहे. पण लंडनमध्ये ती कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत नसून एका अपार्टमेन्टमध्ये राहत आहे. ती सध्या आनंद अहुजा या तिच्या तथाकथित प्रियकर आनंद अहुजा याच्या घरी राहत असल्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये होत आहे.

आनंद अहुजा हा दिल्लीस्थित व्यावसायिक आहे. ‘भाने’ या नावाने त्याची स्वतःची क्लोदिंग लाइन आहे. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासोबत वेळ घालवताना दिसली. सोशल मीडियावर ती तिच्या प्रियकरासोबत वेळ घालवतानाचा फोटोही व्हायरल झाला आहे. तिनेही तिच्या स्नॅपचॅटवरुन आनंद आणि इतर मित्रांसोबतचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ते लंडनमध्ये फिरतानाचे हे फोटो आहेत. त्यामुळे सध्या लंडनमध्ये सुट्यांचा आनंद लुटणारी सोनम भारतात येताना जास्त खुष होऊन येईल यात काही नवल नाही.

काही दिवसांपूर्वी बझफीड इंडियाच्या पोस्टमध्ये तिने न घाबरता बॉलीवूडमध्ये सुरुवातींच्या दिवसांत तिच्यावर करण्यात आलेल्या टिप्पणी बद्दल उघडपणे सांगितले आहे. यात तिने स्त्रियांच्या शरीरयष्ठीवर होणारी टीका (बॉडी शेमिंग), स्ट्रेच मार्क, चित्रपटसृष्टीसाठी तिने केलेले कष्ट इतकेच नाही तर सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रींना भेट देण्यासाठी देण्यात येणारे मानधन यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 1:00 am

Web Title: what sonam kapoor is living in with her boyfriend in london
Next Stories
1 वरुण धवनच्या गाडीचा अपघात
2 पाकिस्तानची बाजू घेणारे माझे सहकलाकारही गेले उडत- विक्रम गोखले
3 ‘बिग बॉस १०’मधे दिसतील हे सर्वसामान्य चेहरे
Just Now!
X