बॉलिवूडमध्ये ८० च्या दशकात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘चुपके चुपके’. धर्मेंद्र, शर्मिला टागोर, अमिताभ बच्चन, जया बच्चन, ओम प्रकाश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या विनोदी चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती स्वतः ऋषिकेश आणि एन. सी. सिप्पी यांनी केली होती. उपेंद्रनाथ गांगुली यांच्या ‘छदोभेषी’ या बंगाली कथेवरून ‘चुपके चुपके’ची पटकथा लिहिण्यात आली होती. लता मंगेशकर यांनी गायलेले ‘अब के सजन सावन में’ आणि किशोर कुमार, मोहम्मद रफींनी गायलेले ‘सा रे ग म’ ही गाणी आजही अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये ऐकायला मिळतात.

प्रश्न : ‘चुपके चुपके’मध्ये परिमल त्रिपाठी कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते?
पर्याय
१. फिजिक्स
२. सायन्स
३. बॉटनी

प्रो. परिमल त्रिपाठी (धर्मेंद्र) आणि सुलेखा चतुर्वेदी (शर्मिला टगोर) हे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर लग्न करतात. परिमल हा आयुष्य मस्त मजेत घालवणारा व्यक्ती असतो. सुलेखा अगदी त्याच्या उलट असते. सुलेखाच्या मनात तिच्या बहिणीच्या पतीविषयी खूप आदर असतो. आपले भाऊजी खूप हुशार आहेत असा तिचा समज असतो. त्यामुळे परिमलच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो आणि सुलेखाचे भाऊजी राघवेंद्र (ओम प्रकाश) हे काही तत्वज्ञ नसून एक सामान्य व्यक्ती असल्याचा खुलासा करण्याचा तो ठरवतो. राघवेंद्र हरिपाद भैय्याला (डेव्हिड अब्राहम चेऊलकर) अस्खलित हिंदी बोलणाऱ्या ड्रायव्हरच्या शोधण्यास सांगतो. कारण, त्याचा आताचा ड्रायव्हर डीकोस्टा (केश्तो मुखर्जी) हिंदी बोलताना व्याकरणाच्या चुका करत असतो. त्यामुळे, परिमलकडे आयती संधी चालून येते. इंग्रजी भाषेचा तिरस्कार असणारा प्यारे मोहन इलाहाबादी बनून  राघवेंद्रकडे ड्रायव्हरची नोकरी मिळवतो. दुसरीकडे, सुलेखा आपल्या वैवाहिक आयुष्यात खूश नसल्याचे तिच्या भाऊजींना भासवत असते. हे नाटक आणखी पुढे नेण्यासाठी सुकुमार सिन्हा (अमिताभ बच्चन) तिचा पती बनून येतो. यानंतर, ज्या काही नाट्यमय घडामोडी घडतात त्या पाहण्याजोग्या आहेत.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
‘जो जिता वही सिकंदर’ चित्रपटामध्ये आमिर खानच्या (संजू) कॅफेचं नाव काय होतं?
उत्तर- रामलाल्स कॅफे