विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बॉबी जासूस’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात चित्रपटातील दुसरा प्रमुख कलाकार अली फैझल बहुतांश वेळा दृष्टीस पडत नाही. विशेष फिल्मच्या ‘खामोशियाँ’ चित्रपटात तो व्यस्त असल्याने प्रसिद्धी कार्यक्रमात उपस्थित राहात नसल्याचे सांगण्यात येत आहे. विद्या बालन ‘बॉबी जासासू’च्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी अनेक शहरांना भेट देत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना, अलीला चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग करावयाचे आहे. परंतु, हातात असलेले काम पूर्ण करायचे असल्याने, तो ‘बॉबी जासूस’च्या प्रसिद्धी कार्यक्रमाला वेळ देऊ शकत नाही. अलीच्या जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरं तर ‘बॉबी जासूस’च्या प्रसिद्धी कार्यक्रमात उपस्थित राहाण्यासाठी अली खूप प्रयत्न करतो आहे. परंतु, कामात व्यस्त असल्यामुळे त्याला प्रसिद्धी कार्यक्रमात उपस्थित राहाणे शक्य होत नाही. ‘खामोशियाँ’ चित्रपटाच्या शुटिंगमधून एक-दोन दिवसांचा वेळ काढून अलीने ‘बॉबी जासूस’ प्रसिद्धी कार्यक्रमात उपस्थिती लावली. ‘बॉबी जासूस’ हा त्याच्यासाठी मोठा चित्रपट आहे. पुढील आठवड्याच्या सुरुवातीला सुरू होणाऱ्या प्रसिद्धी कार्यक्रमात शेवटच्या पाच दिवसांत तो चित्रपटाची प्रसिद्धी करताना दिसणार आहे. याआधी अली ‘३ इडियट्स’, ‘ऑलवेज कभी कभी’ आणि ‘फुक्रे’ चित्रपटात दिसला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 3:40 am