02 March 2021

News Flash

… म्हणून सलमान ऑनस्क्रिन किस करत नाही

यानंतर सलमानने कोणत्याही अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रिन किस केले नाही

सलमान खान

तुम्ही कधी सलमान खानला ऑनस्क्रिन किस करताना पाहिले आहे का? बॉलिवूडमध्ये कदाचित फक्त सलमानच असा एकमेव अभिनेता आहे ज्याने ऑनस्क्रिन किस एकदाही केलेले नाही. सलमानशिवाय अजय देवगण, आमिर खान, शाहरुख खान, संजय दत्त इत्यादी अभिनेत्यांनी अनेक सिनेमांमध्ये इंटिमेट सीन दिले आहेत. पण सलमानसोबत असे काय झाले असेल की त्याने ऑनस्क्रिन किस न करण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

त्याचे झाले असे की, १९८९ मध्ये सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान सलमानसोबत असे काही घडले की त्यानंतर त्याने ऑनस्क्रिन किस न करण्याचा निर्णय घेतला. सिनेमाच्या एका दृश्यात सलमानला भाग्यश्रीला हलकासा किस करायचा होता. पण भाग्यश्रीने हा सीन देण्यास स्पष्ट नकार दिला. दिग्दर्शकाला पुढे काय करावे हे कळतच नव्हते. शेवटी यावर उपाय म्हणून त्यांनी दोघांमध्ये काचेचा दरवाजा उभा केला आणि ते दृश्य चित्रीत केले.

यानंतर सलमानने कोणत्याही अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रिन किस केले नाही. भाईजानच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, या मागचे खरे कारण त्याचे कुटुंब असल्याचे म्हणता येईल. सलमानच्या म्हणण्यानुसार, त्याचे कुटुंब फार मोठी आहे. ते सगळे एकत्र सिनेमा पाहणं पसंत करतात. त्यामुळे घरच्यांसोबत सिनेमा पाहताना कोणालाही अवघडल्यासारखे वाटू नये यासाठी तो सिनेमा निवडताना काळजीपूर्वक निवडतो.

एका मुलाखतीत सलमान म्हणाला की, ‘अनेकदा आम्ही घरी सर्व एकत्र सिनेमा पाहतो. खासकरून इंग्रजी सिनेमा पाहताना त्यात इंटिमेट सीन असतील तर तिथे बसलेले सर्वच अवघडून जातात. यामुळेच मी माझ्या सिनेमांमध्ये असे दृश्य देणं कटाक्षाने टाळतो.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 12:47 pm

Web Title: when actress bhagyashree refused kiss salman khan maine pyar kiya
Next Stories
1 Ragini MMS Returns : ‘रियाने माझा लैंगिक छळ केला नाही’
2 लतादीदींची खोटी सही करून ‘ती’ने अनेकांकडून पैसे उकळले
3 PHOTO : निवेदिता सराफ झाल्या ‘नॉस्टॅल्जिक’
Just Now!
X