बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. तिने हॉलिवूड गायक निक जोनासशी लग्न केले आहे. पण एक काळ असा होता की ती अमेरिकेतून पळून भारतात आली होती. याचा उल्लेख प्रियांकाने तिच्या ‘अनफिनिश’ या पुस्तकात केला आहे. तिने लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत म्हटले आहे की जेव्हा ती १२ वर्षांची होती तेव्हा शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. पण शाळेत इतर मूल देत असलेल्या त्रासाला कंटाळून ती अमेरिका सोडून मायदेशी परतली होती.

प्रियांका चोप्राने ‘अनफिनिश’ या पुस्तकात तिच्या जीवनातल्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. त्यावेळी तिने अमेरिकेत शिक्षण घेत असतानाच्याही काही गोष्टी सांगितल्या आहेत. ‘शाळेत मी शिक्षण घेत असताना इतर मुले मला त्रास द्यायची. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम झाला होता. तेव्हा मला प्रचंड राग आला होता. माझ्याकडे कोणी पाहिले तरी मी घाबरायचे. माझ्याकडे कोणी पाहू नये असे मला वाटायचे. मला तेथून गायब व्हायचे होते. माझा आत्मविश्वास कमी झाला होता. त्यावेळी मी काय करावे आणि काय करु नये हे मला कळत नव्हते’ असे प्रियांकाने म्हटले आहे.

फोटो :‘देसी गर्ल’चे १४५ कोटींचे क्लासिक घर, आतून पाहाल तर चक्रावून जाल

पुढे ती म्हणाली, ‘शाळेत मला मुली चिडवायच्या. त्या मला माझ्या देशात परत जाण्यास सांगत होत्या. मी अनेकांकडे मदतही मागितली होती पण कोणीही मदत केली नाही. मी त्या शाळेला दोष देणार नाही. त्या शाळेतील मुले सर्वांशी अशीच वागतात आणि त्यामध्ये त्यांची काही चूक नाही. आता मी ३५ वर्षांची झाले आहे त्यामुळे मला या सर्वाची दुसरी बाजू देखील कळाली आहे. पण एक काळ असा होती की मी अमेरिकेशी ब्रेकअप करुन भारतात पळून आले होते.’