सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिला एका मुलाखतीत भारतात सार्वजनिक ठिकाणी किस करण्यावर काही प्रश्न विचारण्यात आला होते. त्यावर ऐश्वर्याने बिनधास्तपणे उत्तर देत अनेकांची मने जिंकली होती.
ऐश्वर्याने २००५ मध्ये अमेरिकेतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘ओप्रा विन्फ्रे’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. ऐश्वर्याने देखील बिनधास्तपणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान तिला सार्वजनिक ठिकाणी किस करण्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या शोमध्ये ओप्रा विन्फ्रने ऐश्वर्याला किस करण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर तिने ‘भारतात लोकं किस करतात पण रस्त्याच्या बाजूला उभे राहून किंवा रस्त्याच्या एका कोपऱ्यात करत नाहीत. कारण भारतीयांसाठी ते भावनिक सुद्धा आहे. त्यामुळे या गोष्टी भारतात नेहमी खासगी ठेवल्या जातात’ असे म्हटले आहे. त्यावेळी तिच्या या उत्तराने अनेकांची मने जिंकली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 7:12 pm