News Flash

अक्षय विसरला होता ट्विंकलचा वाढदिवस, अचानक द्यावे लागले होते ‘हे’ गिफ्ट

अक्षयने दिलेले गिफ्ट ऐकून तुम्हालाही हसू येईल

बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे सर्वांचे लाडके कपल आहेत. त्या दोघांविषयी जाणून घ्यायला चाहते फार उत्सुक असताता. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकलने एकदा अक्षय तिचा वाढदिवस विसलरला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने दिलेल्या गिफ्टचा देखील उल्लेख केला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचा व्हिडीओ ‘कॉफी विथ करण’ या शोमधील आहे. ‘जेव्हा आम्ही पहिले एकमेकांना डेट करत होतो तेव्हा माझ्या वाढदिवशी अक्षयने मला क्रिस्टल पेपरवेट गिफ्ट म्हणून दिले होते. एक पेपरवेट! मला नाही माहित अक्षयने काय विचार करुन मला ते गिफ्ट दिले होते’ असे ट्विंकलने म्हटले होते.

त्यानंतर अक्षय ट्विंकलला उत्तर देतो. ‘खरं तर मी ट्विंकलचा वाढदिवस विसरलो होतो. पण जेव्हा लक्षात आले की ट्विंकलचा वाढदिवस आहे तेव्हा गिफ्ट आणायला जायला माझ्याकडे वेळ नव्हता. पेपरवेट माझ्या घरातच होते. मी त्याला लगेच रॅप केले आणि तिला गिफ्ट म्हणून दिले’ असे अक्षय म्हणाला. त्यानंतर भविष्यात त्याच पेपर वेटच्या वजना इतका मोठा डायमंड अक्षयकडून घ्यायचा असे ट्विंकलने ठकरवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 6:13 pm

Web Title: when akshay kumar forgot twinkle khanna birthday avb 95
Next Stories
1 Video : वादक ते संगीतकार ;अशोक पत्की यांचा संगीतमय प्रवास
2 ..म्हणून सुशांतच्या शेवटच्या चित्रपटातील ‘हा’ डायलॉग होतोय ट्रेण्ड
3 केआरकेने सुशांतवर केलेला जुना व्हिडीओपाहून नेटकरी संतापले…
Just Now!
X