25 January 2021

News Flash

अक्षय कुमार सांगतोय, “पती म्हणून माझी ही सवय सर्वांत वाईट”

या सवयीबद्दल अक्षयने करण जोहरच्या चॅट शोमध्ये सांगितलं.

अक्षय कुमार

बॉलिवूडमधला सर्वांत लोकप्रिय अभिनेता असण्यासोबतच अक्षय कुमार त्याच्या कुटुंबाकडेही पूर्ण लक्ष देतो. अक्षय नेहमी त्याचं शूटिंग वेळेवर आटपून पत्नी व मुलांना पुरेसा वेळ देण्याला प्राधान्य देतो. मात्र पती म्हणून त्याची एक वाईट सवय, जी त्याने करण जोहरच्या चॅट शोमध्ये बोलून दाखवली.

अक्षय कुमारला स्पोर्ट्स फार आवडत असल्याने घरी परतल्यावर क्रिकेट किंवा इतर खेळ तो टीव्हीवर आवर्जून पाहत असतो. पण हीच सवय पती म्हणून सर्वांत वाईट असल्याचं त्याने सांगितलं. “साधारणपणे मी संध्याकाळी साडेसहापर्यंत शूटिंग आटपून घरी येतो. घरी आल्यावर सर्वांत आधी मला टीव्हीवर स्पोर्ट्स पाहायचं असतं. ट्विंकलच्या बुक लाँच कार्यक्रमात ती पाहुण्यांशी बोलत होती आणि मी हळूच मधे मधे स्कोअर चेक करत होतो”, असं त्याने सांगितलं.

आणखी वाचा : वेब सीरिजच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा अभिनयाकडे

अक्षयच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ‘बेल बॉटम’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘पृथ्वीराज चौहान’, ‘बच्चन पांडे’ असे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. नुकतंच त्याने स्कॉटलँडमध्ये ‘बेल बॉटम’चं चित्रीकरण पूर्ण केलं. अक्षयच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात तो क्रिती सनॉनसोबत भूमिका साकारणार आहे. तर ‘लक्ष्मी बॉम्ब’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 1:45 pm

Web Title: when akshay kumar revealed his worst habit as a husband ssv 92
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये काम न मिळाल्याने अभिनेत्याला विकावी लागली बाईक
2 वेब सीरिजच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा अभिनयाकडे
3 लतिका आणि अभिमन्यूची जुळणार रेशीमगाठ!
Just Now!
X