21 January 2018

News Flash

सिद्धार्थमुळे झालेल्या वादानंतर आलिया- जॅकलिन आमनेसामने आल्या अन्…

'जुडवा २'च्या स्क्रिनिंगला या दोन अभिनेत्रींची समोरासमोर भेट झाली.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 29, 2017 7:03 PM

जॅकलिन फर्नांडिस, आलिया भट्ट

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि आलिया भट्ट यांच्यातील ‘कोल्ड वॉर’बद्दल अनेकांनाच माहीत झाले आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्यामुळे या अभिनेत्रींमध्ये भांडण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. मुंबईतील जुहू येथे साजिद नाडियादवाला यांनी आयोजिक केलेल्या ‘जुडवा २’च्या स्क्रिनिंगला या दोन अभिनेत्रींची समोरासमोर भेट झाली. दोघींची ही भेट प्रसारमाध्यमांसाठी आश्चर्यकारक ठरली तर सिद्धार्थ मात्र यावेळी अनुपस्थित होता.

गुरुवारी रात्री सेलिब्रिटींसाठी पीव्हीआर जुहू येथे वरुण धवनच्या ‘जुडवा २’ या चित्रपटाची स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, क्रिती सनॉन, टायगर श्रॉफ, दिशा पटानी असे बरेच कलाकार तेथे उपस्थित होते. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे वरुण धवन आणि जॅकलिन येणाऱ्या कलाकारांचे स्वागत करण्यासाठी उभे होते. आलियाने सुरुवातीला वरुणला मिठी मारली आणि शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर ती जॅकलिनकडे वळली. त्यानंतर दोघीही हास्यविनोद करत उभे होते. मुख्य म्हणजे दोघींमध्ये कोणताही संकोच जाणवत नव्हता.

वाचा : सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं अनुष्काला पडलं महागात

शो संपल्यानंतर जेव्हा आलिया बाहेर पडली तेव्हाही तिने जॅकलिन आणि वरुणला मिठी मारत शुभेच्छा दिल्या. ट्विटरवरही तिने चित्रपटाबद्दलचं मत व्यक्त केलं. यामध्ये तिने जॅकलिनला टॅगही केलं आणि जॅकलिननंही आलियाचे आभार मानले. अगदी काहीही न घडल्यासारखं आलिया आणि जॅकलिनचं एकमेकींना भेटणं अनेकांना आश्चर्यचकित करणार होतं. तर सिद्धार्थने मात्र या सर्व वादापासून लांब राहणंच पसंत केलं असावं असंही म्हटलं जात आहे. म्हणूनच जॅकलिनचा चांगला मित्र असूनही ‘जुडवा २’च्या स्क्रिनिंगला उपस्थित राहणं त्याने टाळलं असावं.

First Published on September 29, 2017 7:03 pm

Web Title: when alia bhatt comes face to face with jacqueline fernandez at judwaa 2 screening
  1. No Comments.