News Flash

जेव्हा दंगल गर्ल फातिमा सना शेखसोबत आमिर खानचं नाव जोडलं गेलं होतं!

फातिमा आणि आमिर यांच्यात काहीतरी शिजतंय अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होती.

(File Photo)

बॉलिवूडमधून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं आहे. या बातमीनंतर चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. आमिर आणि किरणने एकमेकांच्या सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विभक्त होण्याचं कोणतही कारणं मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे आमिरने दुसऱ्यांदा घटस्फोट का घेतला असा प्रश्न चाहत्यांना भेडसावू लागला आहे.

दरम्यान आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमानंतर अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत आमिरचं नाव जोडलं गेलं होतं. फातिमा आणि आमिर यांच्यात काहीतरी शिजतंय अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होती. मात्र फातिमानं कुछ तो लोग कहेंगे असं म्हणत आमिरसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला होता.

हे देखील वाचा: आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट ; १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त

“लोक काहीतरी म्हणतीलच त्यांचं कामच आहे बोलणं” असं म्हणत फातिमानं या चर्चांना पूर्णविराम लाव होता. “आमिरचं स्थान माझ्या आय़ुष्यात खूपच महत्त्वाचं आहे. मात्र लोकांच्या चुकीच्या चर्चांमुळे मला स्वत:वर परिणाम करून घ्यायचा नाही” असंही फातिमा म्हणाली होती. यावेळी आमिरसोबतचं फातिमाचं नातं खुद्द आमिरची पत्नी किरण रावनंही फेटाळून लावलं होतं.

हे देखील वाचा: अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती जप्त, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

मात्र आमिरच्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री फातिमा सनाचं नाव चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर फातिमाच्या नावाच्या जोरदार चर्चा असून मीम्सना उधाण आलं आहे. किरणनंतर आता आमिरच्या आयुष्यात फातिमा येणार अशा चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगू लागल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 1:36 pm

Web Title: when amir khan and fatima sana shaikh dating rumors in bollywood kiran rao rejected news kpw 89
Next Stories
1 मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या यूजर्सवर भडकली सोना मोहपात्रा; म्हणाली, “मूर्खतेची सीमा पार केली..”
2 आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट ; १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त
3 केआरके तापसी पन्नूला म्हणाला ‘सी ग्रेड’ अभिनेत्री; ‘हसीन दिलरुबा’ सिनेमाबद्दल म्हणाला…
Just Now!
X