News Flash

‘धडक’चा ट्रेलर पाहून अशी होती अंशुलाची प्रतिक्रिया!

जान्हवीच्या सावत्र बहिणीने या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रतिक्रिया नोंदविली आहे.

अंशुला कपूर

धर्मा प्रोडक्शन अंतर्गत तयार झालेल्या  ‘धडक’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जान्हवी आणि इशान यांची प्रमुख भूमिका  असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही काळातच तो प्रचंड लोकप्रिय झाला आहे. इतकंच नाही तर सध्या त्यांच्यावर सर्व स्तरामधून कौतुकाचा पाऊस  पडत आहे. यातच जान्हवीच्या सावत्र बहिणीने या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रतिक्रिया नोंदविली आहे. अंशुलाची प्रतिक्रिया पाहताच सा-यांच्याच नजरा अंशुला आणि जान्हवीकडे आकर्षिला गेल्या आहेत.

बॉलिवूडची  दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर अंशुला आणि अर्जुन कपूर यांनी बोनी-श्रीदेवी यांच्या कुटुंबापासून फारकत घेतली होती. मात्र श्रीदेवी यांच्या निधनानंतर खचून गेलेल्या जान्हवी आणि खुशीला आधार देण्यासाठी या दोन्ही भावंडांनी पुढाकार घेतला. त्यामुळे सध्या ही चारही भावंड एकत्र दिसून येत आहे. त्यातच त्यांच्या बहिणीचा म्हणजेच जान्हवीच्या धडक या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर अंशुलाने पाहिला असून तिने जान्हवीचे केलेल्या अभिनयाचे कौतूक केले आहे.

‘व्वा! जान्हवी अखेर तुझा बहुप्रतिक्षित ठरलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.मात्र हा ट्रेलर पाहून माझं थोडंस समाधान झालं आहे. पण २० जुलै ही तारीख फारच लांब आहे. त्यासाठी मला एवढी वाट पाहणं खरंच फारच कठीण झालं आहे. जानू आणि इशान तुम्ही दोघांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच गाजणार आहे असा मला विश्वास आहे’, असं अंशुलाने इन्स्टावर पोस्ट करत जान्हवीचं कौतूक केलं आहे. अंशुलाची ही पोस्ट पाहताच जान्हवीनेही तिला  ‘आय लव्ह यु’ असा रिप्लाय दिला आहे.

दरम्यान, अंशुला आणि जान्हवी यांच्या या पोस्टमुळे त्यांच्यातील कटूता कमी झाली असून या बहिणी आता सख्ख्या बहिणींप्रमाणे वावरत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘धडक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपटाचा ट्रेलर सध्या चांगलाच गाजत आहे. त्यामुळे चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असं म्हणायला हकरत नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:08 pm

Web Title: when anshula praised sister janhvi film dhadak trailer see
Next Stories
1 ‘या’ ठिकाणी रणबीरने केले आलिया भट्टला प्रपोज
2 ‘या’ चित्रपटातून महेश बाबू करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
3 चाललंय तरी काय? निकच्या कौटुंबिक कार्यक्रमात प्रियांकाची उपस्थिती
Just Now!
X