14 December 2019

News Flash

मध्यरात्री कारमध्ये ‘ही’ अभिनेत्री करत होती रोमान्स; पोलीस आले अन्…

तिने आपल्या खासगी आयुष्यातील एक अवाक् करणारा किस्सा सांगितला.

अर्चना पूरण सिंह बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. सध्या ती ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये झळकताना दिसत आहे. या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या जागी आलेल्या अर्चनाने नुकताच एक मोठा खुलासा केला. तिने आपल्या खासगी आयुष्यातील एक आवाक् करणारा किस्सा सांगितला.

काय आहे तो किस्सा?

अर्चनाने सांगितले, एकदा तिला व तिच्या पतीला पोलिसांनी रात्री उशीरा कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडले होते. त्यावेळी रात्री जोरदार पाऊस पडत होता. अर्चनाला पावसात भिजायला खुप आवडते. त्यामुळे ती पती परमीत बरोबर भर पावसात लाँग ड्राईव्हवर गेली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोमान्स करताना पकडले. पोलिसांना पाहून अर्चना व परमीत खुप घाबरले होते. त्यांनी आम्ही पती पत्नी आहोत असेही सांगितले त्यानंतर त्यानंतर खुप विनवणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडले.

अर्चना म्हणाली, “आता हा किस्सा आठवून मला खुप हसू येते परंतु त्यावेळी मी खूप घाबरली होती. खरं तर हे खुप रिस्की होते. तेव्हापासून आम्ही रात्री उशीरापर्यंत बाहेर भटकणे टाळतो.”

First Published on November 19, 2019 12:49 pm

Web Title: when archana puran singh and parmeet sethi were caught romancing inside car mppg 94
Just Now!
X