News Flash

माधुरी, अटलजी आणि गोड पदार्थ… वाचा मजेशीर किस्सा

एका कार्यक्रमात घडला होता मजेदार किस्सा

माजी पंतप्रधान आणि एक मातब्बर राजकारणी म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिलं जायचंय. वयाच्या ९३ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे वाजपेयी हे राजकीय विश्वासोबतच कलाविश्वाशीदेखील तितकेच जोडले गेले होते. अनेकदा ते कला आणि राजकीय विश्व यांचा समतोल राखत असल्याचं पाहायला मिळायचं. यामध्येच सध्या अटल बिहारी वाजपेयी आणि अभिनेत्री माधुरी दिक्षित यांचा एका कार्यक्रमातील किस्सा चर्चेत आला आहे. माधुरीमुळे अटल बिहारी वाजपेयी यांनी  कार्यक्रमात जेवणात असलेले गोड पदार्थ खाता आले नाहीत. हा किस्सा रशिद किडवई यांनी एका कार्यक्रमात सांगितला.

एकदा एका आयोजित शासकीय कार्यक्रमात अटजली यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यावेळी अटलजी डाएटवर होते. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या आहाराच्या सवयींवर काही निर्बंध घालण्यात आले होते. मात्र असं असतानादेखील ते जेवणाच्या पंगतीकडे वळताना दिसले. त्यावेळी त्यांना रोखणं त्यांच्या सहकाऱ्यांना शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी एक प्लॅन केला. या प्लॅनमध्ये त्यांनी माधुरी दिक्षितला देखील सहभागी करुन घेतलं.

या कार्यक्रमात माधुरी दिक्षितदेखील आली होती. त्यामुळे अटलजी जेवणाच्या पंगतीकडे जात असताना त्यांच्या सहकार्यांनी अटलजी आणि माधुरी यांची भेट घडवून आणली. या भेटीमध्ये अटलजी माधुरीशी गप्पा मारण्यात व्यग्र झाले. चित्रपट आणि अन्य मुद्द्यांवर ते चर्चा करत असतानाच त्यांच्या सहकाऱ्यांनी जेवणाच्या पंगतीतून / काऊंटरवरुन गोडाचे पदार्थ हटविले. त्यामुळे माधुरीमुळे अटलजींचं गोडाचे पदार्थ खायचं राहूनच गेलं.

दरम्यान, हा प्रसंगी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. परंतु. अटलजी हे एक सच्चे खवय्ये होते. त्यांना कोलकात्याचा पुचका, हैदराबादची बिर्याणी, हलीम आणि लखनऊचे गिलौटी कबाब, चहा हे पदार्थ विशेष आवडायचं असं म्हटलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 1:30 pm

Web Title: when bollywood actress madhuri dixit helped keep atal bihari vajpayee away from sweets ssj 93
Next Stories
1 देवा आणि मोनिकाच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होणार का?
2 …म्हणून बॉबी देओलच्या ‘क्लास ऑफ ८३’ला प्रदीप शर्मांनी बजावली नोटीस
3 कंगनाच्या सुरक्षेसाठी आईने केली पूजा; पाहा व्हिडीओ
Just Now!
X