News Flash

‘खल’ तो नायक

‘रिश्वत का चुना खाया, अब गोली खा..’ असा संवाद ‘शोले’च्या डाकू गब्बर सिंगच्या तोंडून निघतो आहे, अशी कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही. पण, नवीन

| March 21, 2015 12:56 pm

‘रिश्वत का चुना खाया, अब गोली खा..’  असा संवाद ‘शोले’च्या डाकू गब्बर सिंगच्या तोंडून निघतो आहे, अशी कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही. पण, नवीन ‘गब्बर’च्या तोंडून असेच संवाद ऐकू येणार आहेत. जुन्याच गब्बरच्या घाबरवणाऱ्या चेहऱ्याचा वापर करत नवा ‘गब्बर’ ज्याची कामे खलप्रवृत्तीची आहेत मात्र, त्यामागचा हेतू चांगला आहे, असा ‘खल’ नायक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. वाईट मार्गाने को होईना सर्वसामान्यांना ‘न्याय’ मिळवूने देणारे नायक हिंदी चित्रपटांना नविन नसले तरी भन्साळींच्या ‘गब्बर’ या चित्रपटाच्या निमित्ताने अशा ‘खल’ नायकांचा दौर पुन्हा सुरू झाला आहे.
सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाट्टेल तो मार्ग अवलंबणाऱ्या ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांची एक लाटच होती. मात्र, त्यानंतर गेली कित्येक वर्ष प्रेमात आकंठ बुडालेला, जीवाची बाजी लावून आपल्या प्रेमातले अडथळे दूर करणारा नाहीतर प्रेमात अत्यंत गोंधळलेला असा शहरी तरूण यातच बॉलिवूडचे नायक अडकून पडले होते. ‘हम करे सो कायदा..’ ही हिंदी चित्रपटांच्या नायकांची वृत्ती आजही चित्रपटांमधून कायम असली तरी ‘खल’ वृत्तीचा नायक असू शकत नाही. रामगोपाल वर्माच्या ‘सरकार’, ‘सत्या’ सारख्या चित्रपटांनी असे ‘खल’नायक हिंदी चित्रपटांना दिले पण, ते सगळे गुन्हेगारी विश्वात अडकून पडलेले असे नायक होते. सलमान खानचा ‘दबंग’ मधील चुलबुल पांडे मात्र मुळातच भ्रष्टाचारी.. काळ्या पैशातून आपल्या सहकाऱ्यांचे भले करणारा पोलिस इन्स्पेक्टर, ‘किक’मध्येही मोठमोठे दरोडे टाकून लहान मुलांचे आयुष्य वाचवणारा डेव्हिल अशा नायकांचे हिंदी चित्रपटांमधील प्रस्थ वाढत चालले आहे.
संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला ‘गब्बर’ हा या प्रकारातला ताजा चित्रपट ठरणार आहे. अक्षय कुमारने यात गब्बरची भूमिका केली असून समाजातला प्रत्येक भ्रष्टाचार ‘गब्बर स्टाईल’ने मोडून काढणारा नायक या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठीही ‘शोले’च्या गब्बर सिंगचा वापर करण्यात आला आहे. ‘डॉन’ रंगवणारा शाहरूखही आगामी ‘रईस’ चित्रपटात ‘खल’नायक रंगवताना दिसणार आहे.
राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ चित्रपटात शाहरूख गुन्हेगाराची भूमिका साकारणार आहे. शाहरूखने आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीलाच अशाप्रकारच्या भूमिका केल्या होत्या. मात्र, यशराजचा ‘नायक’ म्हणून प्रस्थापित झाल्यानंतर त्याने हा धोका पत्करला नव्हता. आता तो पुन्हा अशा भूमिकांकडे वळला आहे.
मधल्या काळात शाहीद कपूरने ‘कमिने’, नील नितीन मुकेशने ‘जॉनी गद्दार’ सारख्या चित्रपटांमधून अशा भूमिका साकारल्या होत्या. मात्र, अजूनही अशाप्रकारच्या ‘खल’नायकांचे चित्रपट अगदी मोजकेच आहेत. ‘गब्बर’ आणि ‘रईस’ लोकप्रिय झालेच तर आणखी काही ‘खल’ नायक प्रेक्षकांना पहायला मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2015 12:56 pm

Web Title: when bollywood big actor played anti heroes role
Next Stories
1 सई आणि माझ्यात काहीही भांडण नाही – राधिका आपटे
2 घरगुती हिंसाचाराच्या आरोपातून अभिनेत्री रिंकी खन्नाला वगळले
3 शाहरूखवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Just Now!
X