देशभरामध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची बाप्पावर नितांत श्रद्धा आहे. त्यातीलच एक बॉलिवूड सेलेब्स म्हणजे अभिनेत्री जया बच्चन. गणपती बाप्पावर निस्सिम प्रेम करणाऱ्या जया यांनी एका खास कारणामुळे काही वर्षांपूर्वी पुण्यातील दगडूशेठ गणपतीला सोन्याची कर्णफुले अर्पण केली होती.

मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘कुली’ या चित्रपटाच्या सेटवर बिग अर्थात अमिताभ बच्चन एका सीनदरम्यान जखमी झाले होते. त्यांच्यासोबत झालेला हा अपघात साधासुधा नव्हता. यात त्यांचे प्राण जाताजाता वाचले होते. त्यांची ही परिस्थिती पाहिल्यावर अनेक जण त्यांचे प्राण वाचावेत म्हणून देवाकडे प्रार्थना करत होते. यावेळी जया बच्चन यांनीही पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला अमिताभ यांचे प्राण वाचविण्यासाठी साकडं घातलं होतं.

pune school girl suicide, pune school girl attempts suicide
धक्कादायक! तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; लोणी काळभोर येथील घटना
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

अमिताभ या संकटातून सुखरुप बाहेर आले तर सोन्याची कर्णफुले वाहीन, असा नवस जया यांनी केला होता. त्यानंतर हळूहळू बिग बींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि ते या संकटातून वाचले. त्यामुळेच जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीला सोन्याची कर्णफुले वाहिली.

दरम्यान, १९८२ साली ‘कुली’च्या सेटवर अमिताभ जखमी झाले होते. एका मारहाण दृष्यात पुनित इस्सारचा ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात अमिताभ यांच्या पोटात टेबलाचा कोपरा लागला होता.