News Flash

कंगना रणौतच्या ‘या’ बॅगची किंमत वाचून तुमचे डोळे विस्फारतील!

कंगनाचं अभिनय जितकं लक्षवेधी असतं, तितकंच तिचं फॅशनसुद्धा चर्चेत असतं.

कंगना रणौत

बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रणौत ऑनस्क्रीन असो किंवा मग ऑफस्क्रीन, ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. कंगनाचं अभिनय जितकं लक्षवेधी असतं, तितकंच तिचं फॅशनसुद्धा चर्चेत असतं. हटके स्टाइलसाठी ती ओळखली जाते. जिथे सर्व कलाकारांच्या विशिष्ट एअरपोर्ट लूकची चर्चा होते, तिथे कंगनाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. कंगनाने कांजीवरम साडी नेसून एअरपोर्ट फॅशनची व्याख्याच बदलली होती.

केरळ ट्रीपवरून परतताना कंगनाने सोनेरी काठ असलेल्या पांढऱ्या रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. विशेष म्हणजे त्यावर तिने कोणतेच दागिने परिधान केले नव्हते. कंगनाचा हा हटके लूक सर्वांच्याच पसंतीस उतरला होता. याचसोबत तिच्या हातात असलेल्या बॅगनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कंगनाच्या हर्मीस बर्किन Hermès Birkin ब्रँडच्या या बॅगची किंमत तब्बल १२.६ लाख रुपये इतकी आहे. या किंमतीत एखाद्याची संपूर्ण ट्रीप होऊन जाईल. पण म्हणतात ना, हौसेला मोल नसतं.

‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’, ‘मणिकर्णिका’, ‘पंगा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी कंगना लवकरच एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. जयललिता यांच्या चरित्रपटात कंगना मुख्य भूमिका साकारत आहे. हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने २० कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 3:17 pm

Web Title: when kangana ranaut carried an expensive bag worth more than rs 12 lakh ssv 92
Next Stories
1 फोटोतला ‘हा’ चिमुकला आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेता; बिग बींसोबत केलंय काम
2 दाक्षिणात्य ‘हिट’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार राजकुमार राव
3 ‘जीव झाला येडापिसा’च्या चित्रीकरणाला सुरुवात; ‘या’ दिवशी नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X