अभिनेत्रींमधील ‘कॅट फाइट’ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामानाने गेल्या काही वर्षांपासून हे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळतंय. पण, काही वर्षांपूर्वी करिना कपूर खान आणि बिपाशा बासू यांच्यातील भांडण सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले होते. ‘अजनबी’ या २००१ साली आलेल्या चित्रपटात या दोघींनी अक्षय कुमार आणि बॉबी देओल यांच्यासह काम केले होते. त्यावेळचीच ही गोष्ट आहे. या दोघींनी एकमेकींना केवळ अपशब्दच वापरले नाहीत तर अगदी हातही उगारला होता. करिनाने बिपाशाला काली बिल्ली असे म्हटले होते. इतक्यावरच न थांबता तिने तिच्या कानशिलातही लगावली होती. हा विषय काही वर्षांपूर्वी घडला असला, तरी हे वृत्त पुन्हा एकदा सोशल मीडियावर दिसू लागले आहे. काही हिंदी वेबसाईटने या संदर्भातील बातम्या दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कपड्यांवरून या दोघींमध्ये वाद झाला होता. बेबोच्या डिझायनरने तिला न सांगता बिपाशाची मदत केली होती. त्यावरून दोघींमध्ये मोठे भांडण झाले आणि करिना बिपाशाला काली बिल्ली असे म्हणाली होती. तसेच, तिने तिच्या कानशिलातही लगावली.

वाचा : हेमंत ढोमेच्या घरच्या बाप्पाच्या विसर्जनाचा व्हिडिओ पाहा, तुम्हीही अनुकरण कराल

‘फिल्मफेअर’ मासिकाला २००१ साली दिलेल्या मुलाखतीत बिपाशा म्हणाली होती की, तिच्याशी माझा काहीच वाद नव्हता. तिच्या डिझायनरसोबतच तिचे पटत नव्हते. पण त्यांच्या वादात मला का ओढण्यात आले तेच कळत नाही. हे खूपच बालिश वर्तन आहे.

त्यानंतर करिनानेही २००२ साली ‘फिल्मफेअर’लाच दिलेल्या मुलाखतीत तिची बाजू मांडली होती. ती म्हणाली की, तिला स्वतःच्याच कलागुणांवर बहुधा विश्वास नाहीये. चार पानांच्या मुलाखतीत तीन पाने ती माझ्याबद्दलच बोलली आहे. ती स्वतःच्या कामाबद्दल का बोलली नाही? अजनबी चित्रपटादरम्यान डिझायनर विक्रम फडणीसवरून झालेल्या वादावरच केवळ तिला प्रसिद्धी मिळवायची असावी. मी तिला अपशब्द वापरल्याचे तिने मुलाखतीत म्हटले. हे बहुधा तिने कल्पनेत पाहिले असेल.

वाचा : सिने‘नॉलेज’ ‘पिया का घर’ कोणत्या मराठी चित्रपटाचा रिमेक होता?

करिना आणि बिपाशामधील कॅट फाइट एवढ्यावरच थांबली नाही. तर ‘कॉफी विथ करण’च्या एका सिझनमध्ये करिनाने त्यावेळी बिपाशाचा प्रियकर असलेल्या जॉन अब्राहमला ‘एक्स्प्रेशनलेस’ असे म्हटले होते. त्यावर बिपाशानेही तिला प्रत्युत्तर दिले होते. अखेर, २००८ साली करिनाने जुन्या सर्व गोष्टी विसरून सैफ अली खानच्या बर्थडे पार्टीला बिपाशाला आमंत्रित केले होते. सैफच्या बर्थ डे पार्टीनंतर दोन्ही अभिनेत्री एकमेकींच्या वाट्याला गेल्या नाहीत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When kareena kapoor khan called bipasha basu kali billi and slapped her
First published on: 28-08-2017 at 10:35 IST