News Flash

‘करोना विषाणूसारख्या लक्षणांनी मी घाबरले होते’; कृती खरबंदा राहतेय क्वारंटाइनमध्ये

मार्च महिन्यात ती इंटरनॅशनल फ्लाइटने दिल्लीहून मुंबईला आली होती.

कृती खरबंदा

करोना विषाणूसारखी लक्षणे आढळल्याने अभिनेत्री कृती खरबंदा गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये राहत आहे. मार्च महिन्यात ती इंटरनॅशनल फ्लाइटने दिल्लीहून मुंबईला आली होती. त्यानंतर तिला सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवू लागला. या लक्षणांमुळे मला करोनाची लागण झाली की काय अशी भीती मनात निर्माण झाली होती, असा खुलासा कृतीने ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

या मुलाखतीत ती म्हणाली, “करोना विषाणूसारखी लक्षणे असल्याने मी मुंबईला परतल्यावर लगेच क्वारंटाइनमध्ये राहू लागली. त्यावेळी देशात करोनाचे टेस्ट किट आले नव्हते. मला ताप नव्हता. पण लक्षणांवर बारकाइने नजर ठेवण्यास डॉक्टरांनी सांगितलं होतं. पहिले तीन दिवस मी अक्षरश: घाबरली होती. पण नंतर हळूहळू माझी तब्येत सुधारू लागली होती.”

आणखी वाचा : ‘टिक-टॉक’ स्टारला करोनाची लागण; मास्कची उडवली होती खिल्ली

कृतीची काळजी घेण्यासाठी बॉयफ्रेंड पुलकित सम्राट तिच्या घरी राहू लागल्याचं तिने सांगितलं. “लॉकडाउनमध्ये आम्ही एकत्र राहण्याचं ठरवलं. तो माझ्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेतो. त्यामुळे कोणतीही गैरसोय होत नाही”, असं म्हणत तिने पुलकितचे आभार मानले.

कृतीने ‘शादी मे जरुर आना’, ‘हाऊसफुल ४’, ‘पागलपंती’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 6:18 pm

Web Title: when kriti kharbanda thought she had coronavirus i was paranoid ssv 92
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘टिक-टॉक’ स्टारला करोनाची लागण; मास्कची उडवली होती खिल्ली
2 ‘त्या’ ट्विटमुळे उर्वशी अडचणीत; होतोय चोरीचा आरोप
3 ‘तारक मेहता…’मधील या कलाकाराच्या इमारतीत तीन करोनाग्रस्त; सोसायटी सील
Just Now!
X