News Flash

..जेव्हा सोहाला घटस्फोट देण्याच्या चर्चांवर कुणालने दिलं होतं ‘फिल्मी स्टाइल’ उत्तर

दृष्ट लागू नये असा त्यांचा संसार आहे.

कुणाल खेमू आणि सोहा अली खान

बॉलिवूडमधल्या अशा काही जोड्या आहेत, ज्या फार चर्चेत नसतात पण प्रेक्षकांची त्यांना फार पसंती मिळते. अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खानची जोडी अशीच एक आहे. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सोहा व कुणालने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. आता या दोघांना इनाया ही मुलाही आहे. दृष्ट लागू नये असा त्यांचा संसार आहे. पण एकेकाळी या दोघांच्या घटस्फोटाची फार चर्चा होती.

सोहाला घटस्फोट देण्याच्या चर्चांवर कुणालने फिल्मी स्टाइल उत्तर दिलं होतं. घटस्फोटाचे वृत्त सांगणारी बातमी शेअर करत कुणालने लिहिलं होतं, “एक बार जो मेने कमिटमेंट कर दी तो फिर में अपने प्रेस की भी नहा सुनता.” याचसोबत त्याने लिहिलं होतं, “माझं लग्न का संकटात येईल? माझं लग्न का तुटेल? लोकं काहीही बरळतात.”

आणखी वाचा : ‘बबड्या’ हे नाव कसं सुचलं? तेजश्रीने सांगितली खरी गंमत

जुलै २०१४ मध्ये कुणालने पॅरिसमध्ये सोहाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या आधी सोहा अली खान आणि कुणाल खेमु लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. याबाबत दोघांनीही कधीच काही लपवण्याचा किंवा कोणाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 6:14 pm

Web Title: when kunal kemmu denies divorce rumours with soha ali khan ssv 92
Next Stories
1 अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण
2 …म्हणून मी कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही- मुकेश खन्ना
3 ‘हा ही बलात्काराएवढाच मोठा गुन्हा आहे’; ‘तो’ फोटो पाहून हेमांगी कवी संतापली
Just Now!
X