News Flash

ऐश्वर्याला टोमणा मारणाऱ्या दिग्दर्शकाला बिग बींनी दिले उत्तर

हा किस्सा २०११ मधील आहे.

सध्या लॉकडाउनमुळे अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच कलाकार घरात बसुन आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. त्याचबरोबर ते सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अशातच कलाकरांचे जुने फोटो, व्हिडीओ आणि अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. असाच एक किस्सा बॉलिवूडची ब्यूटी क्विन ऐश्वर्या रायचा देखील समोर आला आहे. एका दिग्दर्शकाने तिला टोमणा मारताच तिचे सासरे अमिताभ बच्चन यांनी त्याला सुनावले होते.

हा किस्सा २०११ मधील आहे. जेव्हा ऐश्वर्याची ‘हिरोइन’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. पण काही दिवसांनंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले होते आणि काही दिवसांनंतर ऐश्वर्या प्रेग्नंट असल्यामुळे तिने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

ऐश्वर्याने प्रेग्नंट असतानाही चित्रपटाचे चित्रीकरण केले असल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी केला होता. हा चित्रपट त्यांचासाठी खास प्रोजेक्ट होता आणि त्यांचे या चित्रपटामध्ये नुकसान झाले. जर ऐश्वर्याने तिच्या प्रेग्नंसीबद्दल पहिले सांगितले असते तर चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात केली नसती. या चित्रपटासाठी त्यांनी जवळपास दोन वर्षे मेहनत घेतली असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मधूर भंडारकर यांनी ऐश्वर्यावर आऱोप केल्यावर तिचे सासरे अमिताभ बच्चन यांनी स्पष्टीकरण दिले होते. जेव्हा ऐश्वर्याने हा चित्रपट साईन केला होता तेव्हा त्यांना माहित होते ती विवाहित आहे. म ऐश्वर्याने लग्न करायला नको होते असे तुमचे म्हणणे आहे का? की मुलांना जन्म द्यायला नको होता? मला नाही वाटत कॉन्ट्रॅक्टमध्ये अशा प्रकारचे नियम असायला हवेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 1:58 pm

Web Title: when madhur bhandarkar blamed aishwarya rai hid pregnancy from them amitabh bachchan defends her avb 95
Next Stories
1 “नेहरुंचे विचार आजही देशासाठी लागू”, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना दिग्दर्शकाचं अभिवादन
2 “प्रियांकाचा तो चित्रपट कंटाळवाणा”; पामेलाने ‘देसी गर्ल’ची उडवली खिल्ली
3 ‘दीपिकाला फूलं देण्यासाठी किती खर्च करतोस’? वडिलांच्या प्रश्नावर रणवीरचं थक्क करणारं उत्तर
Just Now!
X