News Flash

त्या दिवसानंतर अनिल कपूरसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय माधूरीने घेतला होता

माधुरीने या मागचं कारण हे एका मुलाखतीत सांगितलं होतं.

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि मिस्टर इंडिया म्हणून सगळ्यांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेते अनिल कपूर हो बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक असून त्यांनी ९०चे दशक गाजवले होते. माधुरी आणि अनिल कपूर एका चित्रपटात म्हणजे त्यांचा चित्रपट हा सुपरहिट होणार असं समीकरण आधी पासून होतं. या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हे दोघे खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र होते. मात्र, एवढी प्रसिद्धी मिळूनही माधुरीने अनिल कपूर सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

माधुरीने असा निर्णय का घेतला? काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या दोघांचं नातं हे मैत्री पेक्षा जास्त असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. माधुरी आणि अनिल कपूर एकमेकांसोबत बराच वेळ घालवत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र, हे सगळं एकदिवस अचानक थांबलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

एके दिवस अनिल कपूर यांची पत्नी सुनिता मुलांना घेऊन सेटवर पोहोचल्या होत्या. त्यावेळी माधुरी तिथून जातं असताना तिने अनिल कपूरला त्याच्या कुटुंबाशी बोलताना पाहिलं. त्याचवेळी माधुरीने अनिल कपूरसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

माधुरीने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केलं. मी अशी कोणतीच गोष्ट करणार नाही ज्यामुळे अनिल कपूरच्या कुटुंबावर त्याचा प्रभाव पडेल. माधुरी आणि अनिल कपूरमध्ये मैत्रिला वगळता कोणतंच नातं नाही असं स्पष्ट केलं होतं.

आणखी वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेमासाठी केलं धर्म परिवर्तन?

त्यानंतर १७ वर्षांनंतर २०१९ मध्ये ‘टोटल धमाल’ या चित्रपटासाठी माधुरी आणि अनिल एकत्र आले होते. या आधी त्यांनी २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुकार’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 1:32 pm

Web Title: when madhuri dixit reportedly decided to skip working with anil kapoor for not bringing any harm upon his family dcp 98
Next Stories
1 अभिनव आणि श्वेता तिवारीच्या भांडणावर पूर्वाश्रमीच्या पतीची प्रतिक्रिया, म्हणाला..
2 Khatron Ke Khiladi 11 : आणखी एक कंटेस्टेंट आऊट ! पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ एक्स कंटेस्टेंटचा पत्ता कट !
3 वाढदिवशी ज्युनिअर एनटीआरकडून चाहत्यांना भेट, ‘RRR’मधील लूक प्रदर्शित
Just Now!
X