News Flash

‘त्याने मला फसवले’, लिएंडरसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर महिमाने केला होता खुलासा

सध्या लिएंडर पेस अभिनेत्री किम शर्माला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

महिमाने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव आहे. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या चित्रपटातून महिमाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. या पहिल्यावहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. पण अचानक एका घटनेनंतर महिमाचे संपूर्ण आयुष्य बदलले. महिमाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे नाव टेनिसपटू लिएंडर पेसशी जोडले गेले होते. पण लिएंडरने महिमाला फसवले असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

ऐकेकाळी माहिमा आणि लिएंडर पेस यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण २०१६मध्ये ‘डार्क चॉकलेट’ चित्रपटाच्या वेळी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जाते. एका मुलाखतीमध्ये महिमाने लिएंडर पेसने फसवल्याचा खुलासा केला होता. ‘लिएंडर एक चांगला टेनिसपटू असेल पण त्याने मला फसवले. माझ्यासोबत योग्य निर्णय घेतला नाही’ असे महिमा म्हणाली. महिमानंतर लिएंडर रिया पिल्लईला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

आणखी वाचा : किम शर्मा- लिएंडर पेस यांच्या रिलेशनवर एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धन राणेची प्रतिक्रिया, म्हणाला…

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

‘माझ्यासाठी हे धक्कादायक नव्हते. जेव्हा मला कळाले की लिएंडर दुसऱ्या एका अभिनेत्रीसोबत फिरत आहे तेव्हा मी त्याला म्हटले की तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यावर परिणाम होणार नाही. मला असे वाटते की त्याने रियासोबतही असेच केले’ असे महिमा म्हणाली.

महिमाने २००६मध्ये आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीशी लग्न केले होते. त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचे नाव अरियाना असे आहे. पण बॉबी आणि महिमामध्ये वाद होऊ लागल्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २०१३मध्ये ते दोघे विभक्त झाले.

सध्या लिएंडर पेस अभिनेत्री किम शर्माला डेट करत आहे. त्यांचे एकत्र गोव्यात फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण दोघांनी अद्याप त्यांच्या रिलेशनशीपवर वक्तव्य केलेल नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 1:55 pm

Web Title: when mahima chaudhry speaks out about how indian tennis player leander paes cheated on her avb 95
Next Stories
1 “अभिनय खूप छान वाटतो, पण ते तात्पुरतं…सामान्य व्यक्तीच एक सुपरहीरो आहे!”; सोनू सूद म्हणाला
2 अर्जुन बिजलानी आणि विशाल आदित्यसोबत श्वेता तिवारीचा डान्स व्हिडीओ व्हायरल
3 ‘शूटिंगचा पहिला दिवस होता आणि…’, ‘मोमो’ने सांगितला अनुभव
Just Now!
X